RBI Action on Banks : RBI च्या दोन प्रतिष्ठित बँकावर मोठी कारवाई,ग्राहकांमध्ये भीती !

RBI Action on Banks : भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया देशातील दोन मोठ्या बँकांवर आरबीआयचे नियमांचे उल्लंघन केल्या संदर्भात कारवाई केलेली आहे. देशातील या दोन मोठ्या आणि प्रतिष्ठित बँकांकडून आपल्या आर्थिक व्यवहार आणि परकीय चलन व्यवहारा संदर्भात आरबीआयची दिशाभूल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.

या बँकांनी आपल्या आर्थिक अहवालात आणि परकीय चलन व्यवहारांमध्ये त्रुटी असताना सुद्धा आरबीआयला योग्य माहिती सादर केली नाही.ही गोष्ट RBI च्या लक्षात येताच आता देशातील या दोन मोठ्या बँकांच्या आर्थिक व्यवहारांवर अंकुश लावण्यासाठी आरबीआय ने दंड ठोठावून कारवाईचा बडगा उभारला आहे.देशातील हे दोन मोठ्या बँकां कोणत्या आहे,ज्यांच्यावर RBI ने थेट कारवाई केली आहे,आणि या बँकांनी नेमके नियमांचे उल्लंघन कसे केले?आणि या बँकावर आरबीआयने दंड आकारण्याची थेट कारवाई का केलेली आहे,हे आपण या माध्यमातून पाहूया….

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून बँकिंग सेक्टर साठी आरबीआयने तयार केलेल्या नियमांचा केल्याप्रकरणी आरबीआयकडून नुकतेच देशातील प्रतिष्ठित सिटी बँक {N.A.} आणि ज्या आयडीबीआय बँकेचा {IDBI}केंद्र सरकार खाजगीकरण करण्याचा विचार करीत आहे,त्या आयडीबीआय बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून बँकिंग नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी लाखो रुपयांचा दंड आकरण्यात आलेला आहे.

CITY Bank NA आणि IDBI बँकेद्वारे परकीय चलन संदर्भात व्यवहार प्रक्रियेमध्ये तुट आणि आणि बँकिंग आर्थिक व्यवहार चा अहवाल आरबीआयला सादर करण्यात आलेला होता.{Bank Produced Report To RBI.}त्यात मोठी तफावत आढळून आल्यानंतर RBI कडून या दोन्ही बँकांवर दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला,अशी माहिती आरबीआयकडून निवेदन जारी करून देण्यात आलेली आहे.

उल्लेखनीय म्हणजे बँकिंग सेंटर मध्ये आर्थिक पारदर्शिता ठेवण्यासाठी आरबीआयकडून मागील काही महिन्यात विविध बँकांवर अशा प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.यादरम्यान आरबीआयने काही बँकांचे  लायसन्स सुद्धा रद्द केल्याची कारवाई झाली आहे.

आता सर्वात मोठी अशी कारवाई या दोन बँकांवर केली आहे.ज्या बँकिंग सेक्टर मध्ये खूप मोठ्या मानल्या जातात अशा आयडीबीआय आणि सिटी बँक NA वर ही आरबीआयची कारवाई बँकिंग सेक्टर मध्ये खळबळ माजविणारी दिसत आहे.

या बँकांवर RBI कारवाईचा आणि दंड आकारण्याचा  सकारात्मक परिणाम देशातील इतर प्रमुख बँकांच्या आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या कामकाजावर होणार आहे.दरम्यान आरबीआयकडून आयडीबीआय आणि सिटी बँक NA या दोन मोठ्या बँकांवर झालेली ही कठोर कारवाई एकूणच या बँकांच्या ग्राहकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण करणारी आहे.पण यासंदर्भात RBI ने या दंडात्मक कारवाईचा बँक आणि ग्राहकांवर काय परिणाम होईल हे  स्पष्ट केलेले आहे.

सिटीबँक N.A. वर 36.28 लाख तर IDBI वर 36.30 लाखांचा दंड.

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून आयडीबीआय आणि सिटी बँक NA वर झालेल्या कारवाई संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.यात या दोन्ही बँकांचे आर्थिक व्यवहारांच्या अहवालावर आणि परकीय चलन व्यवहार मध्ये त्रुट्या आढळून आल्याने आरबीआय ने हा कारवाईचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

या बँकांनी Liberalized Remittance Scheme अंतर्गत RBI ला आपला आर्थिक व्यवहार अहवाल देण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचे या परिपत्रकानुसार स्पष्ट झाले आहे.यामुळेच RBI या कारवाई अंतर्गत सिटीबँक N.A. वर 36.28 लाख रुपयांचा दंड आणि IDBI बँकेला 36.30 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

या दोन्ही बँकांनी आपल्या बँक शाखांमार्फत परकीय चलन खात्यात आलेल्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांची पुरेशी आणि योग्य तपासणी केली नाही,हे आरबीआय ला सादर करण्यात आलेल्या या बँकांच्या रिपोर्ट आणि तपासाचा आधारावर स्पष्ट झाले आहे.यामुळे 21 मार्च 2025 रोजी या बँकांवर आर्थिक दंडाची कारवाई करीत या संदर्भात RBI चे  निवेदन आणि परिपत्रक जारी केलेले आहे.

RBI Action on Banks : दोन्ही बँकांच्या ग्राहकांवर कोणता परिणाम?

आरबीआय कडून सिटी बँक {एनए} आणि आयडीबीआय बँकेविरोधात आर्थिक दंड वसुलीची कारवाई केल्याने बँकिंग सेक्टर मध्ये खळबळ माजली असताना,या बँकांच्या ग्राहकांवर आरबीआय कारवाईचा काय परिणाम होणार यावर विविध चर्चा सुरू आहेत.

या दोन्ही बँकांनी आपल्या परकीय चलन व्यवहारांची योग्य चौकशी न केल्याने आणि आपल्या आरबीआयच्या आर्थिक रिपोर्टमध्ये योग्यरीत्या माहिती न दिल्याने आरबीआय च्या तपासात बँकांच्या रिपोर्टमध्ये त्रुटी दिसून आली.

त्यामुळे हा आर्थिक दंड आकारलेला आहे.{Foreign Currency Transactions}.या संदर्भात आरबीआय ने अधिकृत निवेदन सुद्धा जारी केलेले आहे.यात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की, या दोन्ही बँकांवर झालेल्या आर्थिक दंडाच्या कारवाईमुळे ग्राहकांच्या व्यवहारावर किंवा त्यांच्यासोबत असलेल्या बँकिंग करारांवर कोणताही परिणाम होणार नाही.{Impact On Bank Customers}

याचा अर्थ आरबीआयची कारवाई दोन्ही बँकांच्या प्रशासनिक कामकाजा संदर्भातच करण्यात आलेली आहे,त्यामुळे ही कारवाई बँक पुरतीच  मर्यादित असल्याने बँक प्रशासनाकडूनच आरबीआय या दंडाची वसुली करणार आहे,याचा या बँकेच्या ग्राहकांवर कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही.

कारवाई संदर्भात काय म्हटले आरबीआयने.

आयडीबीआय आणि सिटी बँकांवर त्यांच्या आर्थिक अहवालांच्या रिपोर्टमध्ये त्रुटी आणि परकीय चलन खात्यांतर्गत योग्य चौकशी आणि तपासणी न केल्याने कारवाई करण्यात आलेली आहे.आरबीआय तपासणीत सिटीबँक कडून आंतरराष्ट्रीय वित्त व्यवहारांच्या पारदर्शकतेसाठी जरुरी असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आलेले आहे.

तर IDBI या बँकेच्या परकीय चलन व्यवहारांची निगराणी प्रक्रिया योग्यप्रकारे करण्यात आली नाही,यात RBI नियमांचे उल्लंघन करण्यात आले.यामुळे एकूणच वित्तीय नियमांच्या पालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता बँकिंग क्षेत्रातील नियम जास्त कडक करण्यासाठी RBI थेट कारवाईची पाऊले उचलताना दिसत आहे.

बँकिंग क्षेत्रात नियमांचे काटेकोर पालनासाठी RBI चे निर्देश.

आरबीआय ने स्पष्ट केले आहे की बँकिंग क्षेत्रात नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आरबीआयने दोन्ही बँकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतलेला आहे. सर्व बँकांनी RBI ने ठेवून दिलेले नियम आणि त्याचे पालन करण्यासाठी आणि आपल्या कामकाज प्रणालीत सुधारणा आणि पारदर्शीता असावी,असा इशारा या दोन मोठ्या बँकावर कारवाई करताना बँकिंग सेक्टरला RBI ने दिला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.