Ratan Tata : टाटा समुहातील शिखरावरील सर्वोच्च रत्न हरपले, रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन.

Ratan Tata : टाटा समुहातील शिखरावरील सर्वोच्च रत्न हरपले, रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन.

Ratan Tata : टाटा समुहातील शिखरावरील सर्वोच्च रत्न हरपले, रतन टाटा यांचे 86 व्या वर्षी निधन.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे देहावसान झाले आहे.रतन टाटा 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते.गुरुवारच्या रात्री मुंबई मधील ब्रीच कँडी इस्पितळात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. रतन टाटांच्या निधनाने उद्योगजगतासह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.भारताच्या उद्योगक्षेत्रातील अग्रणी आणि भारतीयांसाठी आदरणीय असे नाव काळाच्या पडद्याआड गेल्याने देशभरात शोक व्यक्त होत आहे.

Ratan Tata यांच्या निधनाने देशाची अपूरनिय अशी क्षती झाली आहे.Ratan Tata यांच्या निधनानंतर देशभरातून राजकीय,सामाजिक आणि उद्योजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात गुरुवारी शासनाकडून शोक संवेदना व्यक्त करून एक दिवसाचा दुखवटा घोषित करून मुंबई येथील मंत्रालयावरील राष्ट्रीय ध्वज अर्धा खाली उतरण्यात आला. स्व.रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल. त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील NCPA येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होऊन संध्याकाळी 4 वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन अंत्ययात्रा वरळीमधील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी 4.30 वाजता रतन टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार होईल.

रतन टाटा यांचा जीवन प्रवास.

देशात आणि जगात टाटा उद्योग समूहाचे सर्वे सर्व असलेले जगविख्यात उद्योजक रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला होता. 1971 मध्ये रतन टाटा समुहातील नेल्को कंपनीची त्यांनी सर्वात प्रथम धुरा सांभाळली होती.ते टाटा समुहाचे माजी अध्यक्ष होते.यापूर्वी 1990 ते 2012 या काळात रतन टाटा यांनी टाटा समुहाचा उत्कृष्ट नेतृत्व करीत टाटा साम्राज्याची समर्थपणे धुरा सांभाळली. यानंतर जेआरडींकडून रतन टाटा यांची टाटा साम्राज्याचे पुढील उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. कंपनीच्या अध्यक्षपदावर असताना रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समुहासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.भारत सरकारकडून रतन टाटा यांना वर्ष 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि 2008 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारने रतन टाटांचा सन्मान करण्यात आला होता.

रतन टाटा यांची “X” वर शेवटची पोस्ट.

रतन टाटा यांनी सोमवारी X वरील आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या अफवा फेटाळून लावत आपल्या चाहत्यांसाठी संदेश लिहिला होता.’माझ्याबद्दल विचार केल्याबद्दल धन्यवाद.’ माझ्या आरोग्याविषयी पसरलेल्या अफवांची मला जाणीव आहे,आणि मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे, सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरू आहे.आणि माझे मनोबल उंच आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + four =