Rashtravadi Congress महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.

Washim : Rashtravadi Congress महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोग अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर यांचे प्रमुख उपस्थितीत आज दिनांक-११ ऑक्टोबर रोजी विश्रामगृह वाशिम येथे रांका महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली,या बैठकीत जिल्हयातील सहा ही तालुक्यातील जबाबदार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,यावेळी शिक्षण,विधी व प्रसार माध्यमातील उच्च शिक्षित शेकडो महिलांनी मा.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे माध्यमातून श्रीमती रुपालीताई चाकणकर यांचे हस्ते पक्ष प्रवेश केला,व आगामी काळात

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबुत करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचा संकल्प केला.यावेळी राज्य महिला आयोग सदस्या श्रीमती आभाताई पांडे यांचेसह माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके,श्री जयकीसन राठोड माजी सभापती जिप वाशिम,श्रीमती सोनलिताई ठाकूर पक्ष निरीक्षक अमरावती जिल्हा,श्री अशोक डोंगरदिवे समाजकल्याण सभापती जिप वाशिम,श्रीमती वैशालीताई लळे महिला व बालकल्याण सभापती जिप वाशिम,श्री चंद्रशेखर डोईफोडे जिप सदस्य वाशिम,

श्री प्रमोद पाटील लळे,श्री अरुण ताथोड अध्यक्ष खरेदी विक्री संघ कारंजा, श्री प्रदीप देशमुख सभापती पस कारंजा,श्री गोविंद वर्मा,श्री सुनील पाटील अखंड तसेच नगरपालिका नगरसेवक, ग्राप सरपंच, कृउबा संचालक कारंजा व सेवा सहकारी सोसायटी पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.आयोजित आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी वाशिम जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती सीमाताई सुरुशे यांची नियुक्ती करण्यात आली.या प्रसंगी सर्व आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी व सदस्य तसेच सहा ही तालुक्यातील सर्व पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.