Rapid Action Force : पुसद येथे रॅपिड ॲक्शन फोर्सचा रूटमार्च.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी*

पुसद :- Rapid Action Force ही दंगल आणि गर्दी नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक विशेष जलद प्रतिक्रिया शाखा आहे. या युनिटचा उपयोग जातीय हिंसाचार, कायदा आणि सुव्यवस्था कर्तव्य, उत्सव आणि निवडणूक कर्तव्ये आणि आंदोलने हाताळण्यासाठी केला गेला आहे. RAF ने सरकारचा मानवी चेहरा प्रक्षेपित करण्यात देखील यश मिळवले आहे आणि देशाच्या विविध भागांमध्ये पूर, भूकंप, चक्रीवादळ आणि साथीच्या रोगांच्या उद्रेकादरम्यान तत्पर बचाव आणि मदत कार्ये करून जनतेशी पूल बांधले आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सदर फोर्स ही गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिनिस्त आहे. सदरची रॅपिड ॲक्शन फोर्स १०७ बटालियन ही पुसद शहरात आज दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल झाली होती. सदर फोर्स ही आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखल झाली होती. या टीममध्ये एकूण १२० जवान असून यातील ६० जवांनाची टीम ही अकोला येथे होती व उर्वरित ६० जवानांची टीम ही पुसद येथे होती. सदर टीम ही भोपाळ वरून पुसद येथे आली असून ती यवतमाळ जिल्ह्यात ७ दिवस राहणार आहे व जिल्ह्यातील सर्व संवेदनशील भागात रूट मार्च करणार असून सध्याची जिल्ह्यातील राजकीय परिस्थिति तसेच परिसराची संपूर्ण माहिती गोळा करणार आहे.

सदरचा रूट मार्च हा शहरातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राहू नये यासाठी काढण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सदर फोर्स ही अभिषेक कुमार यादव ASP यांच्या मार्गदर्शनात अखिलेश कुमार सिंग DYSP यांच्या सोबत रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये मा. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री डॉ. पवन बनसोड यांच्या आदेशान्वये पुसद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पंकज अतुलकर, व स्थानिक पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 + three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.