राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ जाहीर.
चंद्रपूर येथील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी कळविले आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, समीक्षा,ललित आणि आत्मकथन या साहित्य प्रकारांसाठी २०२२ साली प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके मागविण्यात आली होती.या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून जवळपास ३०२ साहित्यकृती प्राप्त झाल्या. त्यातून खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
#कवितासंग्रह #
* काही सांगताच येत नाही -प्रमोदकुमार अणेराव(भंडारा)
* आयडेंटिटीचे ब्रँडेडयुद्ध-अशोक इंगळे(अकोला)
* नाती वांझ होताना-मनीषा पाटील(हरोली)
* सालं अतीच झालं!-खेमराज भोयर
* वर्तुळाच्या आत बाहेर अस्वस्थ मी-राजेंद्र शेंडगे(सोलापूर)
* रानगुज-संतोष काळे(तासगाव)
* अक्षरनामा-अशोक लोटणकर(मुंबई)
* असहमतीचे रंग-अशोक पळवेकर (अमरावती)
* सांजार्थ-प्रताप वाघमारे(नागपूर)
* पेटलेल्या शहराच्या कल्लोळात-पंडित कांबळे(उस्मानाबाद)
#कथासंग्रह#
* उलघाल-प्रा.यशवंत माळी(मोरगाव)
* ट्रोलधाड-वर्षा किडे-कुलकर्णी (नागपूर)
* अशी माणसं अशा गोष्टी-दीपक तांबोळी(जळगाव)
# कादंबरी#
* गोंडर-अशोक कुबडे(नांदेड)
* बाभूळमाया -विकास गुजर (कोल्हापूर)
#आत्मकथन#
* काजवा-पोपट काळे(पुणे)
* पकाल्या-डॉ.खंडेराव शिंदे(रूकडी)
# समीक्षा#
* लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांचे काव्यवाङ्मय:एक शोध-डॉ.अविनाश सांगोलेकर(पुणे)
* बहुजनांचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज-प्राचार्य जे.के.पवार (कोल्हापूर)
* ब्रिटिशकालीन भारतीय पोलीस व्यवस्थेचा प्रारंभ-डॉ. ज्योती कदम(नांदेड)
* समकालीन साहित्यास्वाद-दयासागर बन्ने(सांगली)
* सृजनशोध-डॉ. रुपेश कऱ्हाडे (दिग्रस)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता-डॉ.संभाजी पाटील(संपा.)(लातूर)
* अण्णा भाऊ साठे:एक परिवर्तनवादी विचार-डॉ.विठ्ठल भंडारे(नांदेड)
#ललित#
* घडताना… बिघडताना!-डॉ. सुहासकुमार बोबडे(कराड)
* पाय आणि वाटा-सचिन वसंत पाटील(कर्नाड)
पुरस्कारप्राप्त वरील सर्व मान्यवर साहित्यिकांना विशेष कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी कळविले आहे.