Rajaram Bapu Patil Vidyalaya: विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे: ठाणेदार सुजाता बन्सोड.

Rajaram Bapu Patil Vidyalaya: विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे: ठाणेदार सुजाता बन्सोड.

ढाणकी: बंदी भागातील जेवली येथील राजाराम बापू पाटील विद्यालयातील (Rajaram Bapu Patil Vidyalaya) विद्यार्थ्यांशी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी हितगुज साधत विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रिया पाटील देवसरकर, प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष जाधव, नंदकिशोर बुटले, युवराज पाटील देवसरकर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे व्यसन करावे, आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकून त्यांच्या आज्ञाचे पालन करावे, आपल्या अडीअडचणी पालकांना बिनधास्तपणे सांगून पालकांशी नेहमी संवाद साधावा, रहदारीचे नियम पाळावेत, मोबाईलचा वापर शक्यतो टाळून महत्त्वाच्या व चांगल्या कामासाठीच मोबाईलचा वापर करावा फेक व चुकीचे संदेश पोस्ट फॉरवर्ड करू नये.

अभ्यासाबरोबरच मैदानी खेळाला महत्त्व द्यावे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहावे, खोट्या आमिषाला बळी पडू नये, कुठलेही यश हे अचानक मिळत नसते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून प्रथमता आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राम जाधव आभार प्रदर्शन सय्यद यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

चौकट
ठाणेदारांनी विद्यार्थ्यांना बोलके केले– प्रिया पाटील देवसरकर. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बन्सोड यांनी सर्व विषयांना हात घालत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना बोलके केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 15 =