Railway’s Interesting Facts : जाणून घ्या प्रत्येक ट्रेनच्या मागे का असतात X निशान ?

Railway’s Interesting Facts : भारतीय रेल्वे कडून सर्व रेल गाड्यांच्या शेवटच्या डब्यामागे ‘X'(एक्स) दिलेले असते.Indian Railway.मात्र वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या मागे हे X हे चिन्ह लावल्या जात नाही.

देशात वंदे भारत सेमी एक्सप्रेस Vande Bharat Train ट्रेन ही इंडियन रेल्वे कडून अगदी काही वर्षांपूर्वी सुपरफास्ट प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू झाली आहे. मात्र इतर ट्रेन सारखेच या ट्रेन वर Xएक्स हे चिन्ह का नसते? याविषयी सर्वांना उत्सुकता असते त्याबाबत आपण जाणून घेऊया.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

इंडियन रेल्वे देशात लघु मध्यम आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी दळणवळणाचे प्रमुख आणि महत्त्वाचे साधन मानले जाते.दररोज भारतात लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करीत असतात.

भारतीय रेल्वे हे काश्मीर ते कन्याकुमारी आणि देशातील प्रत्येक भागात जोडलेले आहे. भारतीय रेल्वेने आधुनिक सुविधा आणि रेल्वे सेवेला अपग्रेड केलेले आहे.

रेल्वे विभागाने आपल्या ट्रेन सुविधा वाढवीत असताना, कमी वेळेत जास्त अंतरचे प्रवास सुलभ करण्यासाठी,आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.सध्या भारतीय रेल्वेमध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजेच वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन आहे.

प्रत्येक ट्रेनच्या मागे का असतात X निशान ?

आपण पाहिले असेल की प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे X हे चिन्ह असते.विशेष म्हणजे हेच चिन्ह प्रत्येक ट्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण मानले जाते.प्रत्येक रूटवर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांना अपघातांपासून रोखण्यासाठी हा एक्स चिन्ह महत्त्वाचा असतो.

त्यांच्या शेवटच्या डब्यावर X चिन्ह यासाठी बनविला जाते की,शेवटचा X निशान असलेला डब्बा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या प्रवाशांना तेथून ही ट्रेन पूर्णतः निघून गेल्याचे दर्शवते.

जर प्लॅटफॉर्मवरून समोर जात असलेल्या एखाद्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे एक्स हा चिन्ह दिसला नाही,तर हा रेल्वे अधिकाऱ्यांसाठी एका प्रकारे गंभीर असा अलर्ट मानला जातो,ते अलर्ट म्हणजे समोर जाणाऱ्या ट्रेनचे मागील काही डबे हे समोर गेलेल्या ट्रेन पासून वेगळे झाले आहे.

पुढच्या आपत्कालीन कारवाईला सुरुवात.

एक्स चिन्ह नसलेली ट्रेन प्लॅटफॉर्मवर समोर गेली असेल तर त्याच्या मागे या ट्रेनचे डबे सुटलेले आहे,हे समजले जाते. त्यामुळे तात्काळ संबंधित रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अधिकारी हा अलर्ट समजून जातात.

समोर किंवा मागे काही अपघात होऊ नये यासाठी रेल अधिकारी समोर गेलेल्या ट्रेनला रोखून नंतर मागे सुटलेल्या डब्यांच्या आणि त्यांच्या तांत्रिक संबंधात माहिती घेऊन, पुढच्या आपत्कालीन कारवाईला सुरुवात करतात. विशेष म्हणजे प्रत्येक डब्यामागे असलेले X हा निशान पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा असतो.

Railway’s Interesting Facts : मग वंदे भारत ट्रेनच्या मागे का नसते X चिन्ह?…

भारतीय रेल्वे कडून सर्व प्रकारच्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X हा निशान लावण्यात येतो.कोणत्याही पॅसेंजर ट्रेनच्या सर्वांच्या शेवटच्या डब्यावर एक्सच्या निशान दिसते.हे निशाण भारतीय रेल्वेची ओळख झाली आहे.मात्र आपण सध्या पाहतो की,वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन च्या मागे X एक्स चा हा निशान नसतो.

या मागचे नेमके कारण हे आहे की,वंदे भारत सेमी एक्सप्रेस ट्रेन ही सर्व प्रकारच्या आधुनिक सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज केलेली आहे.तर दुसरीकडे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पूर्णतः मजबुतीने सोबत जुडलेली असते.या ट्रेनची वैशिष्टता म्हणजे वंदे भारत ट्रेन ही प्लॅटफॉर्मवर गरज भासल्यास दोन्ही दिशांनी चालविता येते.

याला वेळ घालविणारे असे इंजिन changing process करावा लागत नाही.कारण वंदे भारतच्या दोन्ही टोकांना आधुनिक कंट्रोलिंग आणि पायलट केबिन असलेले आधुनिक संचलन यंत्रणा असते.वंदे भारत एक्सप्रेस ला शेवटचा डब्बाच नसतो, त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन वर ‘X’चिन्ह देण्यात येत नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two + 16 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.