Railway Strict Rules : भारतीय रेल्वेमध्ये दररोज कोट्यावधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेमध्ये प्रवास हा सार्वजनिक असतो. कारण इतरही नागरिक आपल्या सोबत प्रवास करीत असतात.त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी काही नियम बनविण्यात आले आहेत.ज्यांच्याकडे दुर्लक्ष किंवा उल्लंघन होत असल्यास दंडात्मक कारवाईचे प्रावधान आहेत. मात्र अनेक प्रवाशांना रेल्वेच्या या नियमाबद्दल माहिती नसते किंवा ते याकडे लक्ष देत नाहीत.
पण रेल्वे प्रवासात या नियमांचा उल्लंघन झाल्यास तुरुंगवासात सुद्धा जाण्याची पाळी येते.त्यामुळे सर्व प्रवाशांनी या रेल्वे नियमांचा पालन करणे आणि त्यांची माहिती ठेवणे गरजेचे आहे.हे नियम तोडले तर अशा प्रवाशांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे हे नियम कोणते ते पाहूया……
रेल्वे प्रवास करताना हे नियम प्रवाशांसाठी महत्त्वाचे असते.मात्र सहजासहजी प्रवासी घाईगडबडीत असताना किंवा आपल्या सुविधेनुसार रेल्वेमध्ये बसताना, अशा नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
मात्र रेल्वेने घालून दिलेले हे नियम प्रवाशांना पालन करणे महत्वाचे आहे, तर जाणून घ्या हे नियम.
इतर प्रवाशांच्या सुविधेचा ध्यान ठेवणे गरजेचे
- ट्रेनमध्ये जनरल बोगी किंवा इतर कोणत्याही श्रेणीतील रेल्वे डब्यामध्ये प्रवास करताना प्रवाशांनी इतर प्रवाशांच्या सुविधेचा ध्यान ठेवणे गरजेचे आहे.यासाठी काही कठोर नियम आहेत. ट्रेनच्या डब्यामध्ये आवाज करणे,कोणत्याही प्रकारची शिवीगाळ करणे आणि सहप्रवाशांना सोबत असभ्य व्यवहार किंवा त्यांना त्रास देणे चुकीचे असते.या नियमांचे उल्लंघन झाल्यास आणि तक्रार झाल्यास,संबंधित प्रवाशाला रेल्वे नियम उल्लंघन प्रकरणी कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.
बाहेर डोकावणे किंवा हात बाहेर काढला तर दंडात्मक कारवाई.
- ट्रेन डब्यामध्ये आपल्या सीटवर बसल्यानंतर ट्रेन चालू असताना प्रवाशासाठी कडक नियम आहे ते म्हणजे, जर एखादा प्रवासी खिडकीजवळ बसला असेल किंवा दरवाजा समोर उभा असेल,आणि तो बाहेर डोकावत असेल किंवा हात बाहेर काढत असेल तर हे खूप गंभीर आहे, यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते.त्यामुळे जर कुणी प्रवासी बाहेर हात बाहेर काढत असेल किंवा डोकावत असेल तर हा नियम तो प्रवासी मोडतो,त्यामुळे रेल्वे अधिकारी अशा प्रवाशाविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करू शकतात.
प्रवास करताना धूम्रपानाची सक्त मनाई.
- ट्रेन ही सार्वजनिक सरकारी सेवा आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रवास करताना इतर प्रवाशांचा सुविधांचा उल्लंघन होऊ नये यासाठी काही नियम आहेत. यात एक महत्त्वाचा नियम म्हणजे तीन मध्ये प्रवास करताना भोगीमध्ये धूम्रपान करण्यावर सक्त मनाई आहे भोगी मध्ये एखादा प्रवासी धूम्रपान करत असेल तर त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई आणि त्याला तुरुंगवासात सुद्धा जावे लागते.
आपल्याच रिझर्व जागेवर बसणे जरुरी.
- रेल्वे प्रवासासाठी जर आपण रिझर्वेशन केला असेल तर रेल्वेमध्ये आपल्यासाठी जागा रिझर्व असते. त्यामुळे प्रवास करताना त्या सीटवर संबंधित प्रवाशाला बसावे लागते इतर कुणाच्या रिझर्व सीटवर बसणे हे नियम मिळवणे असते त्यामुळे असे केल्यास रेल्वे प्रशासन आणि त्याचे अधिकारीना अशा प्रवाशाविरुद्ध दंडात्मक कारवाई करतात.
रेल्वे विभागाकडून प्रवाशांसाठी प्रवास करताना हे नियम बनविण्यात आले आहे. हे नियम प्रवासी मुळत असेल तर नियमित चौकशी आणि तपास कारवाईतून रेल्वे अधिकारी नियम तोडणारे प्रवासी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक आणि नियमानुसार कायदेशीर कारवाई करीत असतात त्यामुळे तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.