Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या.

या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय सभेच्या माध्यमातूनच काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकी साठी प्रचाराची सुरुवात केली.

शिवाजी पार्क मधील भारत जोडो यात्रेची तयारी :

शिवाजी पार्कवर भारत जोडण्या यात्रेच्या समारोपासाठी तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जय्यत अशी तयारी होती. भव्य अशा पटांगणात मोठा असा मंच तयार करण्यात आला होता. मोठ्या संख्येने लोकांची गर्दी देखील जमली होती. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी संघातील सगळे नेते कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. एकजूटता दर्शविण्यासाठी मंचावर विविध पक्षांचे झेंडे देखील लावण्यात आले होते.

मुंबईत राहुल गांधी यांची समापन रॅली :

मुंबईत विरोधी पक्षाची ताकद दाखवण्यासाठी राहुल गांधी यांनी समापन रॅलीचे आयोजन केले होते. राहुल गांधी यांनी सभेआधी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रेचे आयोजन केले होते. सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान या यात्रेला सुरुवात झाली होती. पदयात्रेदरम्यान गांधी यांनी चैत्यभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. या पदयात्रेत काँग्रेस नेत्यांसोबत सामाजिक सांस्कृतिक मंत्री देखील सहभागी झाले होते तसेच या यात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधींनी संवाद साधला.

शिवाजी पार्क वरून राहुल गांधी यांनी जनतेला केले संबोधन.

राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात करताच जोरदार आतिषबाजी झाली. “जनतेचे मुद्दे बेरोजगारी, हिंसा, दृष्टता, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, अग्नी वीर, जवानांचे मुद्दे आपल्याला मीडियामध्ये स्पष्टपणे कधीच दाखवल्या जात नाही आणि त्यामुळेच मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती, असे ते भाषणाच्या सुरुवातीत म्हणाले.

मोदींवर टीका करत म्हणाले की, “राजाची आत्मा ईव्हीएम, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स मध्ये आहे. त्याच्या दम वरच ते बाकी नेत्यांना धमकावत असून आपल्या पक्षात नेत्यांना सामील करून घेत आहेत. बॉलीवूड ऍक्टर एक्टरेसेस सारखा त्यांचा एक चेहरा आहे आणि त्यांची 56 इंच ची छाती नसून एक खोखला माणूस आहे.”

समोर भाषणात ते म्हणाले, “आज एकीकडे देशाची सर्व संपत्ती काही लोकांकडे आहे. दुसरीकडे तरुण, शेतकरी, मजूर यांच्यावर अन्याय होत आहे.” “आमची हमी हिंदुस्थानचा आवाज आहे, जो आम्ही सर्वसामान्यांना विचारून आणि ऐकून निर्माण केला आहे. भाजप हे काम कधीच करू शकत नाही.” अशा शब्दात त्यांनी टीका केली.

भ्रष्टाचार, लोकशाहीचा धोका आणि भाजपच्या डावपेचांना संबोधित करत राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया ब्लॉक मोहीम सुरू केली. त्यांनी भारत छोडो आंदोलन, सोशल मीडिया नियंत्रण, अरुण जेटलींची धमकी आणि धारावीची क्षमता यावर प्रकाश टाकला.

काय म्हणाले शरद पवार?

“ज्या शहरांमधून महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ चा नारा दिला होता त्याच शहरातून ‘भाजप छोडो’ असा नारा शरद पवार यांनी लावला. ‘भारत छोडो’ या निर्धारासाठी सगळे एकजूट होतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. “मोदीची गॅरंटी देशात आता चालणार नाही.” अशा शब्दात पवारांनी मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की मोदींच्या गॅरंटीत आता सेक्युरिटी राहिलेली नाही.

उद्धव ठाकरे यांचे भाजप वर तिखट बोल.

शिवाजी पार्कवर सुरु झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधींना धन्यवाद व्यक्त करून त्यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. “भाजप हा एक फुगा आहे आणि त्यात हवा भरण्याचे काम देखील आम्हीच केले होते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.” “आमचा विरोध हा मोदीला नाही तर मोदींच्या हुकूमशाहीला आहे.कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हुकूमशाही चाललेली दिसते आहे. आपली ही वेळ आता लोकशाही आपले संविधान वाचवण्याची आहे.”

कार्यक्रमाला कोणकोणत्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली.

प्रियंका गांधी वाड्रा, उद्धव ठाकरे, शरद पवार, तामिळनाडू मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, कल्पना सोरेन, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला, आप चे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य, अशोक गेहलोत, मेहबूबा मुफ्ती, बाळासाहेब थोरात, विजय वाडेट्टीवार, चंद्रकांत खैरे, मोहन जोशी इत्यादी नेत्यांनी हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × one =