इसापूर येथील मातंग समाजाने प्रथमच साजरी केली प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती.

इसापूर येथील मातंग समाजाने प्रथमच साजरी केली प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)*

साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे नगर, इसापूर येथे जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठा महामानव, प्रज्ञासूर्य, भारतरत्न, परमपूज्य, उच्चविद्याविभुषित, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती प्रथमच साजरी करण्यात आली यावेळी ‘मातंग समाजाला विकास करावयाचा असेल तर आंबेडकरी विचारधारा अनुसरून बाबासाहेब यांच्या विचारावर मार्गक्रमाण करावे लागेल तेव्हाच तो समाज विकासा सोबतच अन्यायचा प्रतिकारसुद्धा करेल’.

असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भास्कर थोरात यांनी केले यावेळी मातंग समाजाचे गोविंद पडोळे, दिलीप पडोळे, विलास पडोळे, गजानन पडोळे, आकाश पडोळे, किशोर रणखांब ज्ञानबा रणखांब, सोबतच सरपंच आद. अमजद समदखान पठाण , सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच आद. भास्कर दादा थोरात, प्रमुख पाहुणे म्हणून आद. उत्तमरावजी ढोले माजी सरपंच, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष आद. बाबू भैया, ग्रामपंचायत तसेच माजी संरपच कैलासराव नाईक, तसेचं माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते जि. के थोरात,नईम खान.

सामाजिक कार्यकर्ते मुकिंदा थोरात अनमोल दादा ढोले, देवानंद ढोले, यांच्यसह बरेच आंबेडकर प्रेमी समूह उपस्थित होता. सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे आयोजक आंबेडकरी कवी व गजलकार शशांक खंदारे यांनी केले होते. उपस्थित सर्व मान्यवराचे आभारमानून.. एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने घेऊन बाबासाहेबांच्या जयघोषत या कार्क्रमाची सांगता करण्यात आली…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × one =