Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद.
Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद.
वहदते इस्लामी हिंद तर्फे संपूर्ण भारतभरात दिनांक 5 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत ‘मानव गौरव अभियान’ साजरा केला जात आहे यानिमित्ताने पुसद शहरात विभिन्न सामाजिक कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सर्वप्रथम वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मानव गौरव अभियान अंतर्गत मानवतेचे महत्व तसेच मानवतेचे मूल्य जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे यासाठी त्यांना प्रेरित करण्यात आले तसेच मानवी मूल्यांची जोपासना करताना आई-वडील, शिक्षक यांचा मान सन्मान करावा, आई-वडिलांनी ज्याप्रकारे लहानपनी आपली सेवा केली तशीच वृद्धपकाळात त्यांची सेवा करावी, समाजातील वंचित-शोषित घटक तसेच स्त्रियांचा आदर व या सर्वांबद्दल मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांची शिकवण काय होती याबद्दल माहिती प्रमुख वक्त्यांनी दिली.
दुपारच्या सत्रात रेस्ट हाऊस मध्ये पुसद येथील विभिन्न सामाजिक संघटनांचे अध्यक्ष, सचिव यांची विशेष सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये सर्व समाजातील घटकांनी एकत्र येऊन मानवतेला कशाप्रकारे वाचवता येईल व मानव कल्याणासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल चर्चा केली व सरते शेवटी प्रमुख वक्ते अब्दुल वाहब मलक यांनी मानवाचा पृथ्वीवर येण्याचा मूळ उद्देश जर सर्वांनी समजून घेतला तर मानवता सुद्धा वाचवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांनी ज्या प्रकारे समाजातील लोकांचे मन परिवर्तन करून एक आदर्श असा समाज प्रस्थापित केला त्याच मूल्यांची पुन्हा एकदा आजच्या जगाला गरज आहे याबद्दल लोकांना जाणीव करून दिली.
संध्याकाळी 7:00 वाजता पुसद शहरातील अतिथी हॉटेल या ठिकाणी शिक्षक, कर्मचारी व व्यवसायिकांची सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये अब्दुल वाहब मलक यांनी मानव गौरव अभियानाबद्दल लोकांना माहिती सांगितली आणि पृथ्वीची उत्पत्ती व मानवाची उत्पत्ती व त्याचे सिद्धांत याबद्दल सविस्तर विस्तृतपणे लोकांना मार्गदर्शन करून व कशाप्रकारे मानव हा उत्तरदायी होऊ शकतो याची स्पष्टता आणून दिली व या उत्तरदायित्वाद्वारेच माणसांमध्ये मानवी गौरव निर्माण करता येईल याबद्दल लोकांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी वहदत-ए-इस्लामी हिंदच्या संपूर्ण पुसद युनिटने परिश्रम घेतले.