Pusad Crime: जुन्या वादात तरुणाची हत्या.

Pusad Crime: एका तरुणाचा निघृण खून करून मृतदेह पोत्यात बांधून फेकलेल्या स्थितीत आढळून आला होता. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी पुसद तालुक्यातील उडदी लाखी घाटात उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी गुन्हाचा छडा लावून मारेकऱ्याला अटक केली. जुन्या वादातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. शेख सलमान शेख बिस्मिल्ला (वय 25 रा. अनसिंग जि. वाशिम) असे मृतकाचे नाव आहे.

तर उबेर पठाण अजित पठाण खान (वय 21 रा. अनसिंग) व त्याचे इतर चार साथीदार असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पुसद तालुक्यातील उडदीच्या घाटात 14 ऑक्टोबर रोजीच्या पहाटे पोत्यात एक मृतदेह आढळून आला. पुसद ग्रामीण पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान ही माहिती मिळली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी रवाना होवून पंचनामा केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

प्रथमदर्शनी ही हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. दरम्यान काही तासातच पुसद ग्रामीण पोलिसांनी गुन्हा छडा लावला. मृत शेख सलमान व उबेर पठाण व त्याचे दोन ते तीन जण भागीदारीमध्ये अनसिंग येथे भुसा मार्केटमध्ये व्यवसाय करीत होते. 13 ऑक्टोबर रोजी अनसिंग येथील जाफर यांच्या गोदामात शेख सलमान सोबत उबेर पठाण ने पैशाच्या कारणावरून वाद निर्माण केला होता.

त्यानंतर तीन ते चार जणांनी मिळून गळा चिरून व त्याच्या शरीरावर सपासप वार करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उडदीच्या घाटामध्ये आणून फेकला होता. याप्रकरणी मृतकाचा भाऊ फिर्यादी शेख अरबाज शेख मनोहर (वय 20 रा. अनसिंग जिल्हा वाशिम याने ग्रामिण पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

thirteen − 7 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.