Punyashlok Ahilyadevi Holkar Yojna : शेतकऱ्यांना 2 लाख 77 हजार 500 रुपये मिळवून देणारी योजना काय कोणती ?

Punyashlok Ahilyadevi Holkar Yojna : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता सरकारने लाखो रुपये अनुदान मिळवून देणारी योजना राबविणे सुरू केले आहे.शेतकऱ्यांना आपल्या शेतात अंतर्गत रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुदान स्वरूपात 2 लाख 77 हजार 500 रुपयांची मदत मिळणार आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून ही आर्थिक मदत मिळेल.यासाठी अर्ज आणि इतर प्रक्रिया काय आहे ती जाणून घेवू या….

भारत हा कृषिप्रधान देश असून 70 टक्के जनता ग्रामीण भागात वास्तव्य करते. आणि ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यात महाराष्ट्र राज्य हा कृषी उत्पादन आणि विविध पीके, फळ बागायती नटलेला समृध्द असा राज्य आहे.त्यामुळे राज्य सरकार येथील सर्व वर्गातील शेतकऱ्यांना विविध अनुदान योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान आणि इतर आर्थिक आणि शेतीपयोगी मदत करत असते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीशी निगडित पूरक व्यवसाय करता यावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मार्फत राज्यात अनेक योजना शेतकऱ्यांसाठी सध्या सुरू आहेत.यात आता शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतीमध्ये अंतर्गत रोपवाटिका तयार करून,या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा या उद्देशाने अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे.या योजनेतून शेतकऱ्यांना अडीच लाखापेक्षा अधिक आर्थिक मदत रोपवाटिका तयार करण्यासाठी मिळणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन आणि पूरक व्यवसायाची संधी मिळणार.

रोपवाटिका व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत आणि भांडवल गरजेचे असतो.या व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलमुळे शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय सुरू करण्यात आर्थिक अडचण येऊ नये,म्हणून महाराष्ट्र सरकारने ही विशेष योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांकडून दर्जेदार भाजीपाला पीक आणि कीटक मुक्त रोप निर्मिती करून व्यवसाय सुरू करणारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी,इतर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा,ग्रामीण भागातील स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळावी,यासाठी योजना अमलात आणण्यात आली आहे.

राज्यात एकूणच पिक रचनेत बदल घडवून शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांना दर्जेदार आणि विशुद्ध शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली फळ,भाजी रोपे मिळावी,हा या योजनेमागचा राज्य सरकारचा उद्देश्य आहे.

महाराष्ट्र सरकार कडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तयार करण्यासाठी,शेतकऱ्यांना दोन लाख 77 हजार 500 रुपयांचा अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना हा लाभ कसा मिळतो योजनेचे स्वरूप कसे आहेत,आणि याची माहिती कुठून घ्यावी हे जाणून घेणे गरजेचे आहे.

कृषी विभागामार्फत तालुकास्तरावर राबविली जात आहे योजना.

राज्य सरकारने विविध जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत तालुकास्तरावर किमान एक तरी रोपवाटिका निर्माण व्हावी हा लक्ष ठेवला असून, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी अर्जदाराकडे किमान 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे.

अर्जदार शेतकऱ्यांकडे शेतीत रोपवाटिकेसाठी लागणारी सिंचन व्यवस्था उपलब्ध राहणे आवश्यक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या योजनेसाठी कृषी पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल. यातही विशेषकर महिला पदवीधारकांना योजनेत प्राथमिकता मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत तालुका स्तरावर शेतकरी गट आणि महिला गट असे दोन गट असेल.यात या दोन्ही गटाला प्राधान्य दिले जाते.तर भाजीपाला उत्पादक आणि अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी आणि इतर शेतकरी गटांना या योजनेत तृतीय क्रमांक प्राधान्य दिल्या जाते.

अशी माहिती कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. उल्लेखनीय म्हणजे,यापूर्वी आपल्या शेतात शेडनेट हाऊस, हरितगृह,आणि रोपवाटिकांसाठी सरकारचे लाभ घेणाऱ्या व्यक्ती आणि शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ घेता येणार नाही. असे नियम सरकारने या योजनेत नमूद केले आहे.

असा मिळेल अनुदान.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारण्यासाठी शेडनेट,प्लास्टिक टनेल प्लास्टिक कॅरेट्स,पॉवर नेपसॅक स्प्रेयर आदी साहित्यांसाठी अनुदान दिले जाते. असा रोपवाटिका प्रकल्प उभारण्यासाठी किमान 5 लाख 55 हजार रुपयांचा खर्च येतो.

यापैकी 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात सरकारकडून वाटप केली जाते.अर्थातच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या रोपवाटिकेसाठी लागणाऱ्या एकूण खर्चात 50 टक्के खर्च म्हणजे दोन लाख 77 हजार पाचशे रुपये एवढा अनुदान सरकारकडून मिळेल.

योजनेत अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि शेतात रोपवाटिका तयार करण्यासाठी,शेतकऱ्यांना अर्जासोबत विविध कागदपत्रे प्रस्तुत करणे आवश्यक आहे.यात खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

  • अर्जदार शेतकरीच्या शेताचा 7/12 सातबारा,नमुना 8 अ.
  • शेतकऱ्यांचे बँक पासबुक खात्याचे विवरण.
  • शेतकऱ्याचा आधार कार्ड.
  • शेताचा किंवा रोपवाटिकेचा स्थळदर्शक नकाशा.
  • अर्जदार कृषी पदविका धारक असेल तर त्या संबंधात शासकीय प्रमाणपत्र.
  • शेतकरी गट असल्यास गटाचा नोंदणी प्रमाणपत्र.

ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी लागते.

येथे मिळेल माहिती आणि करू शकाल अर्ज.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता यावे,यासाठी कृषी कार्यालयातून माहिती दिल्या जाते.सोबतच महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी माहिती पोर्टल आणि mahadbtmahait.gov.in या शासनाचे अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येऊ शकते. किंवा अर्जदार शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन या संबंधात सविस्तर अशी माहिती घेऊ शकतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.