पिंपळगावच्या विविध कामांच्या चौकशीसाठी पंचायत समिती समोर उपोषण.
पिंपळगावच्या विविध कामांच्या चौकशीसाठी पंचायत समिती समोर उपोषण.
नायगाव तालुका प्रतिनिधी : नायगाव शहरा जवळ च असलेल्या पिंपळगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत सन 2012 ते 2022 अंतर्गत झालेल्या कामाची तात्काळ समिती नेमून चौकशी करण्यात यावे यासाठी दि. 7 नोव्हेंबर पासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. पिपळगाव येथे सन. 2012 ते 2022 या काळातील खालीलप्रमाणे चौकशी करण्यात यावी.
ग्रामपंचायत नमुना नं.08 ची चौकशी, ग्रामपंचायत ओपन स्पेस ची चौकशी, जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी 15 व्या वित्त आयोग सन 2016 ते सन 2022 पर्यंतच्या कामाची चौकशी, दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामाची सन 2012 ते 2022 पर्यंतच्या कामाची चौकशी करणे, घरपट्टी वसुली 2012 ते 2022 च्या घरपट्टी पावतीची चौकशी करणे शौचालय अनुदानाची चौकशी करणे,
ग्रा. पं. अंतर्गत इतर निधी व जनरल खातेसंबंधीत झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी निवेदनातून गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या कडे करण्यात आले होते परंतु 6 नोव्हेंबर पर्यंत चौकशी झाली नसल्याने दि. 7 नोव्हेंबर पासून नायगाव पंचायत समिती समोर अमरण उपोषणाला रावसाहेब मैसाजी कदम, वैजनाथ लक्ष्मण लाडके यांनी बसले आहेत.