मराठा समाजाला ओबीसींच्या ताटातील आरक्षण देऊ नये, वेगळ्या मराठा आरक्षणा साठी आम्ही मदत करतोओबीसी मेळाव्यात Prakash Ambedkar यांचे मत.

मराठा समाजाला ओबीसींच्या ताटातील आरक्षण देऊ नये, वेगळ्या मराठा आरक्षणा साठी आम्ही मदत करतोओबीसी मेळाव्यात Prakash Ambedkar यांचे मत.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ओबीसींचे आरक्षण वाढविन्याचे आधिकार हे राज्यांला नसुन केंद्र सरकारला आहेत. मराठा समाजास आरक्षण मिळावे पण ओबीसीच्या ताटातून देऊ नये, असे सांगत भाजपाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे. संविधान वाचेल तरच आरक्षण टिकेल, त्यासाठी सर्वानी एक होऊन हे संविधान वाचविले पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. Prakash Ambedkar यांनी केले. नरसी येथे आरक्षण बचाव ओबीसी महामेळाव्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

 

यावेळी उदघाटक म्हणून प्रकाश अण्णा शेंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. विकास महात्मे, प्रा.टि.पी. मुंडे, हरिभाऊ शेळके, चंद्रकांत बनकर, कल्याण दळेकर, नागोराव बनकर, किशनराव चव्हाण, किर्तीकर बुरांडे, तुकाराम साठे, रवि शिदे, संभाजीराव धुळगुंडे, फारूख अहेमद, नागोरावपाचांळ, प्रा. किशन चव्हाण, आर. डॉ. शिंदे, यांच्यासह आदी यार बलातेदारांचे नेते उपस्थित होते. ते पुढे बोलताना अँड. आंबेडकर म्हणाले, सध्या राज्यात आरक्षणाचा प्रश्न पुढे आला आहे.

जरांगे पाटील तुम्ही आरक्षण मागा, पण ओबीसीच्या ताटातले मागू नका मराठयांचे साट वेगळे आहे. येणाऱ्या काळात ओबीसीमध्ये एकजूट ठेवा मग, सत्ता ओबीसीच्याच हातात आल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र त्यांनी दिला.महायुती सरकारवर हल्ला करतांना ते म्हणाले, सध्या राज्यात चोराचे राज्य चालू असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा संविधान बदलण्याचा आहे.

संविधानात वाईट काय आहे ते, आम्हाला सांगा असे आवाहन ही आंबेडकर यांनी सरकारला केले. तर येणा-या काळात निवडणूकीच्या अनुषंगाने दंगली होणार असल्याचे बोलले जात आहे. राजकारणात नैतिकता असली पाहिजे नैतिकता असले तरच देशातील माणूस हा ताठ मानाने जगेल आणि ते जगला पाहिजे.देशात महागाईने कहर केला असून पंतप्रधान मोदी यांनी जनतेला पंधरा लाख तरी दिलेच नाहीत.

असा टोला लगावत आता  २२ जानेवारी रोजी घरोघरी दिवाळी साजरी करा म्हणतात. दिवाळी साजरी करण्यासाठी किमान आमच्या खात्यात पाचशे रुपये टाका असा मार्मिक टोला मोदी यांना लगावला. अॅड. प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे खा विकास महात्मे यांसह  अनेकांनी ओबीसी महामेळावा हा आरक्षण बचावासाठी असल्याने देशातील जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या विशेष मागणीसाठी राज्यातील ओबीसी समाजातील राजकीय सामाजिक नेते यांनी विचार व्यक्तकेले ओबीसीचे नेते मंडळी येण्यापूर्वी इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महापुरूषांवर आधारित पोवाडे, तसेच उत्कृष्ट प्रबोधन झाले.या मेळाव्याला फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंचाचा जाहीर पाठिंबा दिला

भुजबळ व पडळकर सह ओबीसी नेत्यांनी पाठ फिरवली.

या महामेळाव्याला मंत्री छगन भुजबळ ,गोपीचंद पडळकर हे संबोधीत करणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली होती पण त्यांनी,महादेव जानकर,विनय कोरे या सह अनेक ओबीसी  मान्यवरांनी पाठ फिरवली.या मुळे मेळावा चालू असताना अनेकांनी काढता पाय घेतला. वाहन संख्या व उपस्थिती पाहता वाहनाबरोबरच समाजाच्या उपस्थितीवरून नियोजनाची कमतरता दिसून आली. लोकांना आसनव्यवस्था बरोबर नसल्याने उन्हाची तीव्रता जास्त वाढल्याने अनेकांनी सभेच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × three =