Prahar चे आमदार Rajkumar Patel लवकरच शिंदे गटाच्या तंबू शिरणार. अध्यक्ष आमदार बच्चू कडू झटका.
Prahar चे आमदार Rajkumar Patel लवकरच शिंदे गटाच्या तंबू शिरणार.अध्यक्ष आमदार बच्चू कडू झटका.
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रहार हा सामाजिक आणि राजकीय संघटन आहे.आता मात्र संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मोठा झटका देण्याची तयारी केल्या जात आहे. प्रहार संघटनेचे आमदार राजकुमार पटेल लवकरच शिंदे गटाच्या तंबूत दाखल होऊ शकतात.राजकीय स्तरावर ही वार्ता समोर येताच संस्थापक आमदार कडू यांनी आपल्या परीने शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.आमच्या संघटनेला शिंदे गटाने तोडण्याचा प्रयत्न केला असून आम्ही याला योग्यरीत्या उत्तर देऊ याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा कडू यांनी दिला आहे.
काय होणार प्रहारमध्ये?
लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, अशात प्रहार संघटनेला मोठा धक्का बसण्याची या वार्तेतून शक्यता निर्माण झाली आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे प्रहार पक्ष सोडून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याबाबत प्रहार चे नेते बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.आपल्या पक्षाला कमकुवत करण्यासाठी भाजप शिवसेनेची ही खेळी असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल आपला पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेतस जाणार अशी जोरदार चर्चा आहे याच्यामागे प्रकारचे संस्थापक बच्चू कडू यांना अमरावती जिल्ह्यात आणि इतर भागात कसे कमजोर करता येईल असे या प्रयत्नातून दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून राजकुमार पटेल यांना येत्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात येईल अशी चर्चा आहे.मात्र कोणताही नेत्यांवर पक्ष नव्हे तर नेता जनतेवर अवलंबून असतो.असे एक गेले तर आम्ही पुन्हा दहा आमदार निर्माण करू अशा शब्दात बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटावर घनाघात केला आहे.वीस वर्षात कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेता आम्ही राजकीय आणि सामाजिक आव्हान पेलले.
काही लोक असे असतात की ते निवडणुकीला घाबरतात पण आम्ही निवडणुकीला नेहमी समोर जातो.राजकमल पटेल हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी शिवसेनेत जात असतील तर ते जातील. दोस्ती कायम ठेवून शिंदे गटासोबत जात आहेत,आम्हीही आता दोस्ती कायम ठेवूनच निवडणूक लढू,अश्या रीतीने शिंदे गटाने आमच्या पक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला आहे,याला आम्ही व्यवस्थितरित्या उत्तर देऊ,असा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे.
आणखी काही लोक शिंदे गटाच्या वाटेवर.
दरम्यान प्रहार पक्षातील आणखीन काही लोक पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा आहे.या लोकांसोबत पैशांचा व्यवहार केला जात आहे,लोकसभेचा डाव काढण्याचा त्यांचा आमच्या सोबत प्रयत्न आहे,पण आम्ही खंबीर आहोत “हम किसी से डरते नही है” राजकुमार पटेल यांच्या विरोधामध्ये आम्ही दोस्ती कायम ठेवत त्यांच्या विरोधात प्रहारचा तगडा उमेदवार देऊ असेही आमदार आणि संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी स्पष्ट केले आहे.
………………………