Pradhan Mantri Awas Yojana: मोदी आवास योजनेला लागली पनौतीची झड.

Pradhan Mantri Awas Yojana: मोदी आवास योजनेला लागली पनौतीची झड.

Pradhan Mantri Awas Yojana: सावरगाव येथील विधवा महिलेने दिला उपोषणाचा इशारा

कळंब : ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांना हक्काची घरे देण्यासाठी मोदी आवास योजनेची घोषणा राज्य सरकारने केली. या योजनेत विशेष मागास प्रवर्गांमधील प्राधान्याने विधवा महिला, परितक्त्या महिला व 5 टक्के अपंगाला घरे देण्यात येणार आहेत अशाप्रकारे ओबीसी कल्याण विभागाने ही योजना इतर मागासवर्ग (OBC) या प्रवर्गात येणाऱ्या जातींसाठी आखलेली आहे परंतु कळंब तालुक्यात काही भ्रष्टाचारी अधिकारी व राजकार्यांनी गरजुवंत लाभार्थ्यांना डावलून ज्या लोकांचे पक्के घर असून सुद्धा घराच्या 8 अ उताऱ्यात बदल करून मर्जीतील लोकांना घरकुल चा लाभ मिळत असल्याचा पराक्रम दिसून येते आहे.

ग्रामपंचायत स्तरावर प्राधान्यक्षेत्र लाभार्थींची यादी करतांना ग्रामसभेने घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परितक्त्या महिला, कुटूंब प्रमुख, पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी, जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीबाधीत व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान 5 टक्के उद्दिष्ट दिव्यांगाकरीता राखीव ठेवणे आवयश्क आहे व इतर पात्र कुटुंबे यांना ग्रामसभेने प्राधान्य क्षेत्र देण्यात येणार आहे.

घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरिता स्वत:ची जागा उपलब्ध नाही. असे लाभार्थी योजनेच्या  लाभापासून वंचित राहू नये, याकरीता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतर्गत 500 चौ.फुट जागेपर्यत 50 हजार पर्यंत अनुदान देय असते.

तसेच इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतंर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असते परंतु तालुक्यात सर्वच गावामध्ये कुटुंब प्रमुख विधवा महिला, परितक्त्या महिला व अपंग गरजू लोकांजवळ स्वतःची जागा नसल्याने सदर लाभार्थ्यांना घरकुला पासून वंचित ठेवल्या जात आहे.

म्हणून मोदी आवास योजनेत पनौतीची झड लागल्याची तक्रार सावरगाव येथील विधवा महिला प्रिया गजानन घोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गटविकास अधिकारी कळंब यांना निवेदन/तक्रार दिले असून तक्रारीची रीतसर तातडीने दखल घेतली नाही तर 15 दिवसाच्या आत पंचायत समिती कळंब च्या समोर उपोषणाला बसणार असल्याचे निश्चित केले आहे तरी अश्या परिस्थितीत उदभवणार्या परिस्थितीस शासनाचे अधिकारी जबाबदार राहणार असल्याचे तक्रार विधवा महिलेने दिली आहे. सदर तक्रारी कडे कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर साहेब कशा प्रकारे कार्यवाही करणार या कडे तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − sixteen =