*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब*
दोन ट्रॅक्टर,दोन ट्रकसह मुद्देमाल जप्त.
बाभुळगाव तालुक्यात वाळू तस्करी फोफावली असून पालोती मांगसावंगी,फटियाबाद शिवारातील बेंबळा नदीपात्रातील अवैध चोरटी वाहतूक करणाऱ्याएकाच दिवशी दोन ट्रॅक्टर,व दोन ट्रक व 10 ब्रास वाळू एकूण 50हजार माल जप्त केला सदर कारवाही ही बाभूळगाव पोलिसांनी दि.6 डिसेंबर रोजी केली. बिना नंबरचा सोनाली कंपनीचा निळ्या रंगाचा मुंडा वाहन चालक सूरज संजय चव्हाण रा. पलोती हा घेऊन जात असताना थांबविला असता त्यात 1 ब्रास रेती, 5 किंमत असून तीन लाख किमतीचा ट्रॅक्टर जप्त केला.
तर दुसरी कारवाई ही मांगसावांगी पांदन रस्तावर चालक सूरज राजू पवार भरधाव वेगाने जात असलेला ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास रेती किंमत 5 हजार रुपये . 3 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर व मुदेमाल जप्त केला. विरखेड जाणाऱ्या रस्त्यावर फतीबाद शेत शिवारात बेंबळा नदीवरील ट्रक क्रमांक MH40 Y3855ह्या ट्रकने चालक सुनील शंखर जाधव रा. वाई हा चोरटी वाळू घेऊन जात असताना थाबवून पाहिले असता त्यात3ब्रास किंमत 15 हजार रुपये . 5लाख किंमतीचा ट्रक व रेती जप्त केली.
तसेच ट्रक क्रमांक MH27BX5006 चालक संतोष सूर्यभान मडावी रा.डोर्ली हा आपल वाहनात 3 ब्रास वाळू किंमत 15 हजार रुपये घेऊन जात असताना पकडुन रेती व 5लाख किमतीचा ट्रक जप्त केला. सदर कारवाहीत साहाय्यक फौजदार अशोक गायकी, पोलीस आशिष अवझाडे, सागर विक्रमबेलसरे, होमगार्ड, योगेश सरडे, होमगार्ड चामट यांनी ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गर्शनाखाली केली.