आता प्रत्येक घरासाठी मिळणार सौर पॅनल!! जाणून घ्या काय आहे “PM Surya Ghar Yojana”

PM Surya Ghar Yojana : महावितरण कंपनीकडून देण्यात येणारी वीज ही सशुल्क पुरवठा केल्या जाते मात्र आता आधुनिक युगात सौर ऊर्जेने वीज निर्मिती ही आपल्या घरातच होऊ शकते. आणि यासाठी आता सरकारने प्रत्येक घरात मोफत वीज पुरवठा करण्याचे उद्देशाने नवीन योजना सुरू केली आहे.या योजनेचे नाव “PM Surya Ghar Yojana” असे आहे.

PM Surya Ghar Yojana यात केंद्र सरकारकडून आता देशातील सर्व घरांवर अनुदान देवून सौर पॅनल बसवून देणार आहेत.सोबतच शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारी वीज निर्मितीसाठी सोलर प्रकल्पासाठी अनुदान मिळत आहे. यामुळे विज बिल साठी येणारा खर्च सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वाचवू शकणार आहे.यासाठी केंद्र सरकारने पीएम. सूर्यघर योजना सुरू केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या सोलर पॉवर पॅनल योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा ऑनलाईन आज करावा,आणि यासाठी काय प्रक्रिया आहे आपण या माध्यमातून जाणून घेऊया…..

भारतात सध्या वीज आणि ऊर्जेची मोठी गरज निर्माण झाली आहे.यासाठी एकीकडे सरकार आता सोलर पॉवर आधारित वीज निर्मिती प्रकल्पांमधून वीज निर्मितीवर भर देत आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मोफत वीज मिळावी, यासाठी घरगुती सोलर पावर पॅनल बसविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करीत आहेत.यासाठी PM Surya Ghar Yojna सुरू झाली आहे.

भारतात वाढती ऊर्जेची मागणी आणि पर्यावरण सुरक्षेच्या मुद्द्यांना घेऊन केंद्र सरकारने सोलर पावर आधारित अनेक महत्त्वकांशी योजना देशात सुरू केले आहे.त्यापैकी आता केंद्र सरकारने यानिमित्ताने एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून ते म्हणजे प्रधानमंत्री सुर्यघर सोलर पॉवर पॅनल योजना आहे.Free Solar Power.

सरकारी अनुदानातून आपल्या घरावर सौर पॅनल बसविल्यानंतर नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वीज बिलात आर्थिक बचत होणार आहे.सोलर पॅनल घरी लावल्यानंतर एका सर्वसामान्य कुटुंबाला दर महिन्याला 1 हजार ते 3 हजार रुपयांची आर्थिक बचत होणारा असून, शेतकऱ्यांसाठी सिंचनाकरिता लागणाऱ्या डिझेल पंप खर्च सुद्धा कमी होणार आहे.

एकूणच घरांसाठी आणि शेतीच्या सिंचनासाठी दीर्घकालिक गुंतवणूक म्हणून सोलर पॅनल हे खूपच फायदेशीर ठरते.यासाठी केंद्र सरकार स्तरावर अनुदान सुद्धा मिळत असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना याचा भविष्यात खूप फायदा मिळणार आहे.

हे आहेत सूर्य घर योजनेचे PM Surya Ghar Yojana फायदे.

सौर ऊर्जा निर्मितीमुळे वातावरणात आणि पर्यावरणात प्रदूषण कमी होण्यास मदत मिळत आहे.विशेष म्हणजे पारंपरिक वीज निर्मिती पासून नियमित होणारे कार्बन उत्सर्जन सोलर पावर मुळे कमी होत आहे.त्यामुळे सरकारने देशभरात सोलर पॉवर आधारित प्रकल्प आणि घरगुती सोलर पावर पॅनल बसविण्यावर भर दिला असून यासाठी शासकीय सुर्यघर योजनेतून अनुदान स्वरूपात मदत देण्याची तरतूद या योजनेतून केलेली आहे.

सरकारी आकड्यानुसार एका घरात सोलर पॅनल बसविल्यानंतर वार्षिकरित्या 4 ते 5 टन कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकतो.देशभरात सोलर पॅनल मधून पॉवर निर्मिती झाल्यास सध्या असलेले कार्बन उत्सर्जन चे प्रमाण भविष्यात पूर्णतः कमी होणार आहे.आणि सोलर पॉवर मधून मोफत वीजनिर्मितीमुळे सर्वसामान्य कुटुंबांची वीज बिलापासून सुटका होणार आहे.

केंद्र सरकारची ही निःशुल्क सोलर पॅनेल योजना भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानल्या जात आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना सौर उर्जेतून स्वच्छ ऊर्जेचा लाभ मिळणार आहे, महाग वीज आणि बिलात मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरण संरक्षणात या योजनेमुळे मोठा हातभार लागत आहे.

केंद्र सरकारच्या या सौर योजना अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सरकारी स्तरावर आर्थिक मदत दिली जाते.याच केंद्र सरकारकडून 40 ते 90% पर्यंत सबसिडीचा लाभ मिळू शकतो सरकारने विशेषकर ग्रामीण भागातील रहिवाशांसाठी आणि शेतकऱ्यांना समोर ठेवून ही योजना क्रियानवीत केली आहे यातून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला मोफत वीज मिळणार असून शेतकऱ्यांसाठी घरगुती आणि सिंचनासाठी वीज उपलब्ध होणार आहेत आणि तेही सरकारी अनुदानातून तर त्याला जाणून घेऊया यासाठी काय करावे लागणार आहे.

सौर ऊर्जा क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.यात सोलर पॉवर पॅनल तंत्रज्ञ, विक्रेते, तांत्रिक प्रशिक्षक, देखभाल कर्मचारी अशा विविध पदांवर नोकरीच्या संधीही खाजगी कंपन्यांमध्ये उपलब्ध होत आहेत,त्यामुळे बेरोजगार तरुणांना या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन रोजगाराची संधींचा लाभ मिळत आहे.

सोलर पावर अनुदान साठी पात्रता.

केंद्र सरकारच्या वरील योजनेचा अनुदान लाभ घेण्यासाठी घरात किंवा शेतात वीजनिर्मितीसाठी,सोलर पावर बसविण्यासाठी स्वतःच्या मालकीची किंवा भाड्याची जागा असणे अनिवार्य आहे.

घरगुती पॅनल लावण्यासाठी छतावर पुरेशी जागा आहे किंवा नाही याची पॅनल बसविण्यापूर्वी चाचणी केली जाते.

सोलर पॅनल बसविण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचा सिबिल स्कोर 680 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.

घरगुती स्तरावर 3 किलो वॅट पर्यंत सोलर पावर पॅनल स्थापनेसाठी सरकारने कोणतीही किमान उत्पन्नाची मर्यादा ठेवलेली नाही.

3 ते 0 किलो वॅटसाठी किमान वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असणाऱ्या लाभार्थीसाठी शासकीय अनुदान मिळणार आहे.

हे कागदपत्रे आवश्यक.

केंद्र सरकारच्या फ्री सोलर पॅनल आणि वीज निर्मिती प्रकल्पासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागतील.

  1. अर्जदाराचे ओळखपत्र जसे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  2. रहिवासी दाखला आणि पत्त्याचा पुरावा.
  3. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला.
  4. सुरू असलेल्या वीज मीटरचा बिल.
  5. अर्जदाराचे बँक खात्याचे विवरण.
  6. भाड्याच्या जागेवर सोलर पॅनल लावत असल्यास भाडे करारनामा पुरावा.
  • येथे करा ऑनलाईन अर्ज.
    केंद्र सरकारच्या या सौर योजना अंतर्गत सबसिडीचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
  • पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घेण्यासाठी www.pmsuryaghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर “रूफटॉप सोलर साठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर आपली नोंदणी करा.
  • यात मागितलेली आवश्यक ती माहिती भरा.
  • आवश्यक असलेले आणि अर्जसह मागितलेले कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • तांत्रिक तपासणीसाठी प्रतीक्षा करा.
  • मान्यता मिळाल्यानंतर सोलर पॉवर पॅनल लावण्यासाठी अधिकृत विक्रेत्याची निवड करा.

हे आहेत PM Surya Ghar Yojana विशेष फायदे:

सरकारी सबसिडी मधून घर आणि शेतात 25-30 वर्षे टिकणारी यंत्रणा तयार होईल.

सौर ऊर्जा निर्मिती आणि पॅनेलचे कमी देखभाल खर्च.

सतत सोलर पॉवर माध्यमाने वीज पुरवठा.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही वीज उपलब्ध.

देशभरात तांत्रिक आणि व्यवसायासाठी रोजगार निर्मिती.

ग्रामीण भागात वीज पुरवठा यंत्रणेत सुधारणा.

हे काम जरूर करा.

  • महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या या योजनेतून अनुदान आणि योजनेचा लाभ घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • सोलर पॅनल बसविण्यासाठी केवळ सरकारमान्य विक्रेत्यांकडूनच सबंधित सेवा घ्या.
  • अर्ज करताना सर्व कागदपत्रे योग्यरित्या आहेत किंवा नाही,हे तपासून घ्या.
  • नियमित देखभाल आणि दुरुस्तीची व्यवस्था करा.
  • सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचा लाभ घेताना अधिकृत वीज कनेक्शन आणि मीटरची व्यवस्था करा.
WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

nineteen − 10 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.