PM Shram Yogi Mandhan Yojana : म्हातारपणात आर्थिक जीवन सहज व्हावा,यासाठी पेन्शन देण्याची योजना आखली आहे.आता केंद्र सरकारची ही पेन्शन योजना असंघटित मजुरांना त्यांच्या म्हातारपणात मोठा आधार देणारी ठरणार आहे.यासाठी केंद्र सरकारने पेन्शन योजना सुरू करण्याची व्यवस्था केली असून,असंघटित मजुरांना त्यांच्या भविष्यासाठी पेन्शन देण्याकरिता निधीची विशेष तरतूद केलेली आहे.
केंद्र सरकारच्या या पेन्शनचा लाभ देशभरातील कोट्यावधी असंघटित क्षेत्रातील मजुरांना होणार आहे,जे दररोज कडी मेहनत घेऊन दररोज आपला पोट भरत असते,मात्र त्यांना भविष्यात कोणताही आर्थिक आधार मिळण्याची शाश्वती नसते.
अशा लोकांना भविष्यात कोणतीही आर्थिक सुविधा मिळणार नसल्याने त्यांचे जीवन हालाखीचा असेल अशी चिंता व्यक्त केली जाते. मात्र केंद्र सरकारने अशा संघटित कामगारांना त्यांच्या उतारवयात मोठा आर्थिक आधार या पेन्शन योजनेतून देण्याचे निश्चित केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे देशभरात असे कोट्यावधी लोक आहेत जे असंघटित क्षेत्रातील रोजंदारी मजूर आहेत, जे असंघटित क्षेत्रात काम करतात अशा लोकांना जीवनभर परिश्रम करूनही उतारवयात सुद्धा आपला पोट भरण्यासाठी मेहनतीचे काम करावे लागते,त्यांचा
शारीरिक अशक्तपणा याची परवानगी देत नाही तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना म्हातारपणीत सुद्धा काम करावे लागते.आता केंद्र सरकारने समाजातील अशा विविध वर्गातील असंघटित मजुरांसाठी आणलेल्या विविध योजनेपैकी ही एक महत्त्वाची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी आणि असंघटित मजुरांच्या असुरक्षित भविष्यात त्यांना आता पेन्शन योजना आधार मिळणार आहे.
असंघटित वर्गातील कोट्यावधी मजुरांना केंद्र सरकारच्या या पेन्शनचा मोठा आधार मिळेल.त्यामुळे मजुरांना केंद्र सरकारची ही पेन्शन कशी मिळणार,आणि या योजनेचा भविष्यात लाभ घेण्यासाठी आत्ताच काय करावयाचे आहे, हे आपण या माध्यमातून जाणून घेऊया.{How To Apply PM Shram Yogi Scheme}
केंद्र सरकारने देशभरातील असंघटित क्षेत्रातील मजुरांना भविष्यात आर्थिक आधार देण्यासाठी आणि म्हातारपणात सरकारी पेन्शन रूपात मदत मिळावी, या उद्देशातून ही पेन्शन योजना सुरू केली आहे.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने वर्ष 2019 मध्ये मजुरांना आर्थिक आधार देण्यासाठी त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी “पंतप्रधान श्रम योगी”नावाने ही मानधन पेन्शन योजना सुरू केलेली आहे.
या योजनेचा लाभ आताही असंघटित क्षेत्रातील मजुरांना मिळत आहे. यातून मजुरांना 3 हजार रुपये दरमहा पेन्शन मिळते. ही योजना आताही सुरू आहे. असंघटित क्षेत्रातील मजुरांना या टेन्शन योजनेचा लाभ भविष्यात मिळावा, यासाठी योजनेत अर्ज करून मजुरांना दर महिन्याला भविष्यातील पेन्शन साठी स्वस्त करून काही पैसे बचत करावी लागते, मजुरांनी जेवढा हप्ता पेन्शन साठी जमा केला तेवढीच एकूण रक्कम दर महिना सरकार अशा मजूर लाभार्थी पेन्शनधारकांसाठी जमा करते.
PM Shram Yogi Mandhan Yojana : हे लोक या पेन्शन योजनेसाठी आहे पात्र.
- पंतप्रधान श्रम योगी मानधन पेन्शन योजनेत देशभरातील विविध प्रकारचे वस्तू विक्री करणारे दुकानदार, विविध प्रकारचे वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हरची नोकरी करणारे चालक, रिक्षा चालक, टेलर,धोबी,न्हावी, प्लंबर,अशा सर्व प्रकारच्या असंघटित कामगार क्षेत्रातील मजुरांना या पेन्शन योजनेचा केंद्र सरकार आर्थिक लाभ देत आहे.
- या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष ग्राह्य मानली जाते.
- या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 20 वर्ष योगदान गरजेचे असते.
- मजुराने पेन्शन साठी गुंतवणुकीच्या आधारावर त्याला केंद्र सरकारकडून 60 वर्षे वयानंतर दर महिना निवृत्ती वेतन दिला जातो.
असा करावा लागतो अर्ज.
केंद्र सरकारची पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना मजुरांसाठी उतार वयात भक्कम अशी आर्थिक सवलत देणारी योजना आहे.या योजनेत अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या सीएससी सेंटर( CSC Center’s)सेतू सुविधा केंद्र सोबत इच्छुकांनी संपर्क करावा लागतो. तेथे या पेन्शन योजनेसाठी रजिस्ट्रेशन केल्या जाते.
ही लागतात कागदपत्रे.
केंद्र सरकारची पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना मधून पेन्शन लाभ मिळावा यासाठी
- अर्जदार आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक सेविंग अकाउंट पासबुक किंवा चेक बुक ही कागदपत्रे द्यावी लागते.
सरकारकडून श्रम योगी कार्ड नंबर जारी होतो.
एकदा या योजनेसाठी रजिस्ट्रेशन झाल्यावर, सरकारकडून पेन्शन योजनेसाठी श्रम योगी कार्ड नंबर जारी केला जाते.यानंतर या पेन्शन योजनेत सहभागी होताच पेन्शन योजनेचा हप्ता भरावा लागतो. या योजनेत पेन्शन साठी लाभार्थ्याने जेवढी निर्धारित रक्कम जमा केली,तेवढीच रक्कम केंद्र सरकारकडून लाभार्थीच्या पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत मिळालेल्या कार्ड नंबर खात्यात दर महिना जमा केली जाते.{PM Shram Yogi Card Numbers}