PM Kisan Scheme 19th Installment : केंद्र सरकारकडून मागील काही वर्षांपूर्वी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे.महाराष्ट्रात याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना किंवा पीएम किसान योजना (PM Kisan Scheme)या नावाने ओळखले जाते.यातून दर महिना शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून शेतकरी सन्मान निधी म्हणून वार्षिक 6 हजार रुपयांची रक्कम दिली जाते.अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आर्थिक लाभ या योजनेतून मिळाला आहे.आता लवकरच पीएम.
किसान स्कीम मधून शेतकऱ्यांना 19 वा हप्ता Pm Kisan scheme 19 installment देण्यात येणार आहे.मात्र जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहे त्यांनी आता 19 वां हप्ता मिळण्यापूर्वीच या योजनेच्या यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे.अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहून पुढील आर्थिक लाभ मिळणार नाही. तर मग जाणून घ्या…. काय आहे यामागील कारणे.
केंद्र सरकार द्वारे मागील पंचवार्षिकी मध्ये देशभरातील लघुउद्योग आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची योजना सुरू करण्यात आली होती.देशभरात याद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. ही निधी दर चार महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 3 हप्त्यांची एकत्रित मदत डीबीटी प्रणालीतून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
आतापर्यंत केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना एकूण 18 हप्त्यांचा निधी बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. लवकरच 19 व हप्ता सरकारकडून देण्यात येणार आहे. याची देशभरातील शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.मात्र केंद्र सरकारने आता पीएम किसान सन्मान निधी योजनेत नवीन अशी गाईडलाईन जारी केलेली आहे.यामुळे अनेक शेतकरी किसान सन्मान योजना निधी पासून वंचित राहण्याची शक्यता दिसत आहे.
हे नियम पाळा, अन्यथा पुढील हप्ता मिळणार नाही.
आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा आर्थिक लाभ घेतला आणि आता सरकारने जे नवीन गाईडलाईन आणि नियम बनविले आहे, याचे लाभार्थी शेतकऱ्यांनी योग्यरित्या पालन केले नाही,तर त्यांच्या बँक खात्यात पुढील 19 वा हप्ता जमा होणार नाही.कारण यासाठी पंतप्रधान किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता आपली ही केवायसी (E-kyc) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे सरकारने बनविलेल्या नव्या नियमानुसार पी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आली आहे यात पीएम किसान योजनेच्या अधिकृत www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
अशा शेतकऱ्यांना बसू शकतो,योजनेतून वंचित होण्याचा फटका.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज आणि केवायसी पूर्ण केली, त्यांना आता केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईनुसार ही प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे यात जर शेतकरी अल्पभूधारक असेल तर त्यांची ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे.यासाठी जिल्हा कृषी कार्यालयाकडून किंवा भूमी अभिलेख पडताळणी करून घ्यावयाची आहे.
अन्यथा अशा शेतकऱ्यांना पुढील 19 वा हप्ता मिळणार नाही. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरताना काही चूक केली असेल,किंवा अर्जामध्ये त्रुटी असेल,अर्ज करताना त्यात चुकीचा बँक खाते क्रमांक नमूद झाला असेल,तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता आता थांबविण्यात येणार आहे.
ज्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसेल अशा शेतकऱ्यांचा हप्ताही रोखल्या जावू शकतो.शेतकऱ्यांच्या या चुकांमुळे पुढील हप्ता जमा होणार नाही,असे सरकारने म्हटले आहे. आपल्या चुका सुधारण्यासाठी आणि केवायसी पूर्ण करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रात शेतकरी आपली माहिती या योजनेसाठी अपडेट करू शकतात.
अशी करा आपली ई केवायसी ( E-Kyc) पूर्ण.
पुढील हप्ता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना e kyc पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ नियमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- ही प्रक्रिया ओटीपी OTP च्या आधारे होऊ शकते,यासाठी केवायसी पीएम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲप वर सुद्धा उपलब्ध आहे.
- शेतकरी बायोमेट्रिक आधारावर Biometric System वर आपली ही केवायसी सीएससी CSC सेंटर किंवा एसएसके SSK केंद्रावरून करू शकतात.
- फेस ऑथेंटीकेशन ई केवायसी मोबाईल फोनवर ॲप मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.
याशिवाय या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून होते E-kyc.
यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेत आवश्यक अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी काही टोल फ्री क्रमांक सुरू केले आहे यावरही शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळते.
प्रधानमंत्री किसान योजना टोल फ्री क्रमांक – 18001155266
पी एम किसान लँडलाईन क्रमांक- 011 23381092, 011 23382401
पी एम किसान नवीन हेल्पलाइन टोल क्रमांक- 011 24300605 या क्रमांकावरून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळते.