PM Kisan Maandhan Yojna : शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार 3000 रुपये पेन्शन.पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी भरावा लागेल प्रीमियम.
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पी एम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दर महिना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी 55 ते 200 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. शेतकऱ्याचे साठ वर्ष होतास त्याला प्रतिमा 3000 रुपये पेन्शन केंद्र शासनाकडून देण्यात येईल.आता पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवत आहे. यातून केंद्र सरकारने आतापर्यंत 17 हप्त्यांची रक्कम मिळून 34 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठविले आहेत.
60 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांना मिळणार पेन्शन.
वरील योजनेसारखाच आता प्रधानमंत्री किसान मानधन योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची राहणार आहे. केंद्र शासनाच्या नीती आयोगाने यासाठी मंजुरी दिली असून यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने वित्त सहायतेचा बजेट तयार केलाआहे.त्यामुळे पीएम किसान मानधन योजनेद्वारे वयाच्या 60 वर्ष होताच अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना हितसर अर्ज करावा लागेल कृषी विभागाकडूनही याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावरून शेतकरी ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकतात.
पीएम किसान मानधन योजना नेमकी काय?
केंद्र शासनाची ही शेतकऱ्यांसाठी योजना नेमकी काय आहे, याचा लाभ घेण्यासाठी अटी कोणत्या,तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेलं यावर केंद्र शासनाच्या कृषी मंत्री मंत्रालयाने गाईडलाईन दिली आहे.त्यानुसार पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन दिल्या जाते,यात दरमहा तीन हजार रुपये पेन्शनच्या स्वरुपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. शासनाने ही योजना ऐच्छिक ठेवली असून याचा लाभ घेण्यापूर्वी प्रीमियम म्हणून आधी शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये जमा करावे लागते. यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण होताच अश्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून दरमहा 3 हजार रुपये देते.
कुठे होते नोंदणी.
पी एम किसान पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यात नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते. 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत केंद्र शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी 55 ते 200 रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल.केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल. विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा कमी शेतजमिन असणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विभाग व शासकीय यंत्रणा पेन्शनचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संबंधात तसेच आय संबंधात पूर्व माहिती घेते.शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी आता पर्यंत 20 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
पीएम किसानचा 18 वा हप्ता 18 ऑक्टोबरला मिळणार?
दरम्यान सध्यस्थितीत पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षाला जे 6 हजार रुपये मिळतात.त्यात पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हप्त्यांची रक्कम केंद्र शासनाकडून जमा करण्यात आलेली आहे. आता या योजनेचा 18 हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये बँक खात्यात टाकण्यात येते.दुसरीकडे अशीच योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली असून त्या नमो किसान महासन्मान योजनेतून पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणं राज्य सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा होते.राज्य सरकारने आतापर्यंत चार हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. या योजनेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतात.