PM Berojgari Bhatta Yojna 2024: तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घ्यायचंय? जाणून घ्या संपूर्ण खरी माहिती.

PM Berojgari Bhatta Yojna 2024: तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घ्यायचंय? जाणून घ्या संपूर्ण खरी माहिती.

PM Berojgari Bhatta Yojna 2024: सोशल मीडिया हे माहितीचे भांडार आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, फक्त एका क्लिकवर तुम्हाला संबंधित विषयाशी संबंधित बरीच माहिती मिळते. परंतु या कारणास्तव सोशल मीडियावर योग्य गोष्टी शोधणे कधीकधी अधिक कठीण होते. त्याचप्रमाणे, आजकाल लोकांना एक मेसेज फॉरवर्ड केला जात आहे. ज्यामध्ये प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने बद्दल माहिती समाज माध्यमात पसरत आहे.

बेरोजगार युवकांना दरमहा 3500 रुपये बेरोजगारी भत्ता देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सरकारला देशातील बेरोजगार तरुणांना भत्ता द्यायचा आहे. या योजनेअंतर्गत देशातील तरुणांकडे नोकरी किंवा उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण हा मेसेज कितपत खरा आहे, याविषयी सर्व काही जाणून घेऊया.

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना काय आहे?

देशातील बेरोजगार तरुणांना दरमहा 3500 रुपये भत्त्याचा लाभ घेण्यासाठी 18 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणांनाकडून अर्ज भरण्यात येत असल्याची तसेच नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक यांचा समावेश आहे. असे सांगण्यात येत आहे. परंतु यात काहीच तथ्य अजून सापडले नाही.

केंद्र सरकारने अद्याप अशी कोणतीही योजना आखलेली नाही, ही योजना निव्वळ सोशल मीडिया अफवा आहे. “PM Berojgari Bhatta Yojna 2024” बाबत अद्याप कोणतीही सरकारी घोषणा नाही. सावध रहा. तरुणांची नोंदणी करण्यासाठी बनावट लिंक पसरवली जात आहेत. या लिंकद्वारे लोकांची वैयक्तिक आणि बँक संबंधित माहिती चोरली जाऊ शकते, ज्यामुळे पैश्यांची फसवणूक देखील होऊ शकते. वेळीच तुम्ही सावरले नाही, तर सायबर क्राईम घडायला वेळ सुद्धा लागणार नाही.

प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजना कितपत खरी?

पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना ही सरकारी योजना नाही. त्याच्या लॉन्चची कोणतीही घोषणा झाली नाही आणि कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नाही. परंतु देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी योजनेंतर्गत दरमहा 3000 ते 3500 रुपये देण्याबाबत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

खरे तर अशा प्रकारची सर्व माहिती खोटी आहे. केंद्र सरकारने अद्याप पंतप्रधान भत्ता योजना सुरू केलेली नाही. हे सर्व ऑफलाइन / ऑनलाईन बातम्या आणि फेक न्यूजच्या माध्यमातून पसरत असते. कारण केंद्र सरकार अशा कोणत्याही योजनेचा किंवा माहितीचा दावा करत नाही.

विवेक बुद्धीचा वापर करा आणि सावध राहा.

व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य समाजमाध्यमांच्या अतिवेगवान संपर्क-शक्तीमुळे या गोष्टी सहज आणि विलक्षण वेगाने पसरतात. त्यातून होणारे नुकसान आपल्याला टाळता येऊ शकते असा विचार करायला सुद्धा विवेकाला संधीही उरत नाही, हे अधिक गंभीर आहे. अजून किती काळ आपण ‘माध्यम-अशिक्षित’ राहणार आणि या आधुनिक शोषणाचे बळी ठरणार. याचा विचार करायची आणि त्याविषयी ठोस कृती करण्याची वेळ आता टळून चालली आहे. म्हणूनच सोशल मीडिया वर ट्रेंडिंग चालणाऱ्या कोणत्या बातम्यांवर आपण विश्वास ठेवायला हवे आणि कोणत्या नाही. हे आपल्या विवेक बुद्धीनेच ठरवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − two =