महागाव : पिक विम्या पासुन ३३ हजार शेतकरी वंचित.

महागाव : पिक विम्या पासुन ३३ हजार शेतकरी वंचित.

*महागाव तालुका प्रतिनिधी : गजानन लांडगे*

जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी विचारणार प्रशासनाला जाब.

महागाव:- अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होवुन ही ३३हजार शेतकरी पिक विम्या पासुन वंचित राहिल्याने जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात २३फेब्रुवारीला हजारो शेतकरी विमा कंपनीला जाब विचारण्यासाठी तहसिल कार्यालयावर धडकणार आहेत.खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतातील उभे असलेले पिके नेस्त नाबुत झाले त्यांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा क्लेम सुध्दा केला.

परंतु पिक विमा कंपनीच्या गलथान कारभारामुळे ३३हजार शेतकरी नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या विमा रकमेपासुन वंचित राहिले आहेत याबाबत जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी महागाव तहसिल कार्यालयावर मशाल मोर्चा काढला होता त्यावेळी त्यांनी विमा कंपनीच्या मुबई येथील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून विमा कंपनीचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याचे निदर्शनास आणुन देत शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकणार कोण असा सवाल उपस्थित केला होता.

तेव्हा विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दि.२३फेब्रुवारी रोज शुक्रवारला महागाव तहसिल कार्यालयात येवुन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकुन त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी येणार असल्याचे कळविले त्यानुसार तालुक्यातील शेतकरी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात विमा कंपनीला जाब विचारण्यासाठी तहसिल कार्यालयावर धडकणार आहेत आपल्या हक्काचे विमा कंपनी कडून पैसे मिळवण्यासाठी सर्व पीडित शेतकऱ्यांनी ऐक जुटिने पिक विम्याची पावती घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + nineteen =