डुक्कराने केली दोन एकर परटीची नासाडी.
चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी
दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील लोंढे यांच्या शेतातील दोन एकर परटीची डुक्कराने केली नासाडी. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी आसमानी संकटाचा सामना करता करता नाकी नऊ येतात.जेव्हा चांगले पिक होते तेव्हा भाव मिळत नाही अशा संकटांचा सामना करावा लागतो अशातच वन्यप्राणी उभ्या पिकांचे नुकसान करतात तोंडी आलेला घास वन्यप्राणी पिकांची नासाडी करुन हिरावून घेते.
तरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी यांच्या शेतातील पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे तरी वन्यप्राणी नी केलेल्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तात्काळ नुकसान मोबदला मिळण्यात यावा व वनविभागाने वन्यप्राणी यांना तगडा बंदोबस्त करावा.
(वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वन्यप्राण्यांनी केलेल्या पिकांचे नुकसान ची पाहनी करु नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावेत तसेच वनविभागाच्या मार्फत सौर उर्जा बॅटरी व तार कंपाऊंड देण्यात यावे असे वसंता लोंढे उपाध्यक्ष दिग्रस विधानसभा युवक काँग्रेस)