Petrol-Diesel Prices In Maharashtra : देशात महागाईचा दर वाढला असून यात पेट्रोल डिझेलचे दर खूप दिवसापासून कमी होण्याचे नाव घेत नाही.{Petrol Diesel Price In India}.एकूणच सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त झालेली आहे.सरकारने महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.देशात महागाई दर दिवशी वाढत आहे.{Repo Rate}.जीवनावश्यक वस्तू खूप महाग झाल्याने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे जीवन जगणे दुरापास्त झाले आहे.
सर्वसामान्य जनतेला दैनंदिन गरजा पूर्ण करताना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.यात दररोज कामात येणाऱ्या वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत नसल्याने नागरिकांच्या खिशावर मोठा आर्थिक भार कायम आहे.आखाती देशात क्रूड ऑईल किमती कमी होत असताना सुद्धा मागील दीर्घकाळापासून पेट्रोल डिझेलचे वाढलेल्या किमती स्थिर असून, याच्या किमती कमी होण्याचे नाव घेत नाही.मात्र आता जनतेसाठी लवकरच आनंदाची बातमी समोर येऊ शकते.
ती म्हणजे देशात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार असा अंदाज आता समोर येत आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे आखाती देश आणि अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात.2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आता समोर येत आहे.
अंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल डिझेल किमतीवर होऊन यात घसरण होऊन याचा सकारात्मक परिणाम जनतेवर होणार आहे.क्रुड ऑईलच्या किमती कमी होत असल्याने भारताचा आयात खर्च कमी होऊन येथे दर कमी होणार अशी दाट शक्यता आहे.
Petrol-Diesel Prices In Maharashtra : सर्वात मोठा आयातदार देश भारत.
भारत हा आखाती देश अमेरिका आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो.तसेच भारत हा जगात कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.मात्र क्रूड ऑईल आयात खर्च जास्त असल्याने भारतात पेट्रोल,डीझेल दर जास्त असतात. मात्र नुकतेच आघाडी देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कमी आलेली आहे.
येथे कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 71 डॉलरवर पोचली आहे,तर दुसरीकडे अमेरिकेमध्ये सुद्धा कच्च्या तेलाचे दर कमी झालेले आहे.{US Crude Oil Price}.अमेरिकेत कच्चा तेलाच्या किमतीत घसरण होऊन तो आता प्रति बॅरल 67 डॉलरवर पोहोचला आहे.या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरून पाहायला मिळत आहे.
आखाती देश आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा उत्पादन होतो.तिथे किमती कमी झाल्याने पर्यायी स्वरूपात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होत असते. मात्र भारतात आयात खर्च जास्त असल्याने आणि कच्च्या तेलाची किंमत जास्त असल्याने मागील काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाही.आता क्रूड ऑईल किमतीत मोठी घसरण झाली असल्याने आता भारताच्या पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीवर थेट परिणाम होणार ही दाट शक्यता आहे.
अनेक राज्यात किमती वाढलेल्याच.
अनेक राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेली आहे.पेट्रोल आणि डिझेल किमती जवळपास 100 रुपयांच्या आसपास फिरत आहे.काही राज्यात तर पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे.देशातील प्रमुख शहरांमध्ये सुद्धा पेट्रोलचे दर सध्या स्थिर आहे.यामुळे सर्व सामान्य नागरिकांना महागडा डिझेल आणि पेट्रोल खरेदी करावा लागत आहे.या कारणाने सरकारच्या विरोधात सुद्धा नाराजी दिसत आहे.
जर आपण आखाती देश आणि अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती तर घसरण झाल्यानंतर भारताच्या पेट्रोल डिझेलच्या किमती सोबत तुलना केली तर,देशात ह्या किमती खूप जास्त मानले जात आहे.
मात्र लवकरच सरकार पेट्रोल डिझेल किंमत कमी करून नागरिकांना दिलासा देऊ शकते,याचे कारण म्हणजे भारतीय कमोडिटी तज्ञ येणाऱ्या काही महिन्यात देशांतर्गत Petrol आणि Diesel किमतीत मोठी घसरण आखाती देश आणि अमेरिकेमधील कच्च्या तेलाच्या दरात कमी झाल्याने होऊ शकते अशी शक्यता वर्तवित आहे.
मात्र येणाऱ्या काही महिने पेट्रोल डिझेल दर कमी होण्याची वाट पहावी लागेल.2025 च्या शेवटी भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती तब्बल10 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
महाराष्ट्रात दर कमी होण्याची संकेत.
सध्या आखाती देशांमध्ये क्रूड ऑइलच्या किमतीत कमी येत असल्याने याचा काहीसा फरक महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किमतीवर सुरुवातीला दिसू शकते.
भारतात आयात होणाऱ्या क्रूड ऑइल आणि देशांतर्गत तेलाचे उत्पादन आणि महाराष्ट्रात मुंबई ही समुद्र किनारपट्टीवर असल्याने या भागात येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये घेणाऱ्या काही दिवसात पेट्रोलचे दर तब्बल 10 रुपयांनी कमी होऊन प्रति लिटर 84 ते 85 रुपये आणि डिझेलचे दर 10 रुपये कमी होऊन प्रति लिटर 77 ते 78 रुपयांवर येऊ शकते,सोबतच महाराष्ट्रात काही शहरात सुद्धा पेट्रोल डिझेलच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे,असे झाले तर सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे.