क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा छापा आरोपीकडून मुद्देमाल केला जप्त.

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)*

पातुर: आलेगाव चान्नी पोलिस स्टेशन हद्दीतील आलेगाव येथे राजस्थान संघाविरुद्ध बंगळूरसंघाच्या क्रिकेट सामन्यासाठी पैशांच्या हार-जितवर सट्टा खेळवून खायवाडी करीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी शनिवार, ६ एप्रिल रोजी छापा टाकून कारवाई करीत गुन्हा दाखल केला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी सय्यद समीर सय्यद अमीर, रा. आलेगाव हा आपल्या घरात टीव्हीसमोर बसून क्रिकेट सामना बघत मोबाइल फोनवरून सट्टयाची खायवाडी करीत ती एका नोटबुकवर लिहीत असताना आढळून आला.

पोलिसांनी आरोपीकडून सट्टयासाठी वापरलेला टीव्ही, मोबाइल, नोटबुक व इतर साहित्यांसह एकूण ३५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी सय्यद समिर सय्यद अमीर, सय्यद ऊर्फ पप्पू, राजू पायधन, राजिक रा. आलेगाव, फहीम जमदार रा. पातूर यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन चान्नी येथे विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गजानन केदार, दादाराव आढाव, उमेश सांगळे, स्वाती जाधव, सदानंद व्यवहारे यांनी केली.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × five =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.