मळसूर ग्राम पंचायतच्या कामाची चौकशी करा.
*प्रतिनिधी राहुल सोनोने*
पातूर : पातुर तालुक्यातील मळसुर ग्राम पंचायतचे तत्कालीन सरपंच, सचिव यांनी विविध कामे निकृष्ट दर्जाची करून देयक काढल्याचा आरोप मळसुर ग्राम पंचायतच्या सदस्य मनकर्णा संतोष चौके, यांनी जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकतेच दिलेल्या तक्रारीतून केला आहे. तत्कालीन सरपंच सचिव यांनी सिमेंट रस्त्याचे काम घरातील कंत्राटदाराला दिल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
पाणीपुरवठा पाईपलाईन साठी जे पाईप टाकण्याचे ठरवात मंजूर झाले होते, त्या व्यतिरिक्त इतर निकृष्ट पाईप टाकण्यात आली, तसेच वृक्ष संगोपनासाठी जवळचे मजूर दाखवून पैशाचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे २०१९ ते २०२४ पर्यंतच्या सर्व कामाची मोका पाहणी करून कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया:
माझ्या कार्यकाळात जेवढे कामे करण्यात आली, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन व ठराव पारित करून उत्कृष्ट कामे करण्यात आली, सदर तक्रार बिनबुडाची असून, तक्रारीत काहीही तथ्य नाही.
– शिवाजी देवकते तत्कालीन सरपंच मळसुर
सर्व कामाची चौकशी करून कारवाई करा २०१९ ते २०२४ पर्यंतच्या ग्राम पंचायत अंतर्गत सर्व कामाची मोका पाहणी करून संबंधित तत्कालीन सरपंच सचिव व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य मनकर्णा संतोष चौके, यांनी केली आहे.