आलेगावात गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

आलेगावात गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)*

पातुर : पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि ग्रामीण भागात अवैधधंद्यावर कारवाईचे सत्र सुरू असून आज शनिवारी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने आलेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापेमारी करत दोन आरोर्पीना ताब्यात घेतले. गावठी दारू व साहीत्यासह एकूण १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दारूचा माल नष्ट करण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पथके तयार केली आहेत. आज शनिवारी केलेल्या कारवाईत पोलीसांनी चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव शेतशिवारात गावठी दारु अड्ड्यावर छापा टाकून दारू गाळणाऱ्या विनोद रतन जामकर (वय ३०) व उकर्डा.

दारुचे अड्डे केले उद्धवस्त; दोन आरोपींना अटक.

गोविंदा शिंदे (वय ६२) दोघेही रा. अंधारसांगवी यांना रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेत संपूर्ण गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली. आरोपी कडून एकुण १ हजार ११० लिटर मोहमाच सडवा (किंमत १ लाख ११ हजार रुपये) आणि गावठी हातभट्टीची १०० लिटर दारू (किंमत १० हजार रुपये) असा एकुण १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोर्पीना पुढील कार्यवाही करीता चान्त्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक गोपाल जाधव, पो.अं रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, अनिल राठोड, अशोक सोनवणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 6 =