दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)*
पातूर: पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाहाळा बु येथे दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, ग्रामपंचायत वाहाळा बु येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्यात टीडीएस जवळपास ३७० च्या आसपास असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र समोर आले आहे पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायत कडे आहे.
वाहाळा बु येथील नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जातो का असा प्रश्न सुध्दा उपस्थित होत आहे. नळातून येणारे पाणी बाहेरून जरी स्वच्छ दिसत असेल तरी पाण्यामध्ये जास्त प्रमाणात शार असल्यामुळे हे दूषित पाणी नागरिकासाठी पिण्यासाठी योग्य आहे का असा प्रश्न सुध्दा उपस्थित झाला आहे. असे दूषित पाणी आरोग्यासाठी घातक आहे. अतिसाराची लागण होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा विभागानी तात्काळ या पाण्याची तपासणी करावी व येथील नागरिकांना शार मुक्त पाणी द्यावे या समस्येवर उपाययोजना करण्यात याव्या.
नागरिकांना विकत घ्यावे लागते पाणी.
वाहाळा बु येथील दूषित पाणीपुरवठा असल्याने गावातील नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे नागरिकांना विकत घ्यावे लागते पाणी २० रुपये किंमतीची १५ लिटर पाणी घ्यावे लागते विकत