Patanjali Food Park In Nagpur : पतंजली पार्कमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा होणार! जाणून घ्या !

Patanjali Food Park In Nagpur : नागपुरात मिहान सेज प्रकल्पात नवीन पतंजली फूड अँड हर्बल पार्कमध्ये आता उत्पादनाची सुरुवात झाली आहे.या पतंजली हर्बल फूड पार्कमुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान मध्ये आयोजित पतंजली पार्कच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

विदर्भात या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत, मिहान मधील या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे कल्याण होईल अशी अपेक्षा केंद्रीयमंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. (Union Minister  Nitin Gadkari).

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तसेच या परिसरातील फळांचे उत्पादन आणि त्यांचा दर्जा सुधारण्यासह मालाला चांगला भाव मिळावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती याप्रसंगी गडकरी यांनी दिली.(Mihan Patanjali Food and Herbal Park Inaugurated).

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर मधील मिहान या औद्योगिक क्षेत्रात पतंजली फूड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी पतंजली आयुर्वेदचे समूहाचे सहसंस्थापक योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजली समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते.

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पतंजली प्रकल्पामुळे होणार फायदा.

नागपुरात मिहान मध्ये पतंजली फूड अँड हर्बल पार्क या व्यावसायिक प्रकल्पात ज्यूस सेंटर युनिटचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे उत्पादन सुद्धा सुरू करण्यात आले आहे.आता या पतंजली प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात संत्रा  कल्याण व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजनांची  माहिती देताना म्हटले की,या परिसरात फळांचे उत्पादन वाढावे आणि त्यांचा दर्जा सुधारावा,शेतकऱ्यांच्या फळ मालाला चांगला भाव मिळावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे,आता मिहानमध्ये या नवीन फूड हर्बल उद्यानामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.{Orange Producer Farmers In Vidarbha}

Patanjali Food Park In Nagpur : संत्रा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मिहान येथील पतंजली प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पतंजलीच्या हा प्रकल्प विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार अशी अपेक्षा व्यक्त केली.

ते म्हणाले कि,पतंजलीच्या या प्लांट मध्ये  विविध फळांची वर्गवारी त्यांची प्रत आणि स्टोरेज होणार आहे.सोबतच फळांचे साल आणि बियांसह फळांवर उत्पादनासाठी प्रक्रिया केली होईल.

पतंजलीने रचला देशात कमाईचा विक्रम.

देशात पतंजलीच्या विविध प्रकल्पातून  विविध वस्तू आणि खाद्य पदार्थ आणि हर्बल उत्पाद्न होते.मोठ्या प्रमाणात भारतात पतंजली स्टोर्स आणि इतर दुकानातून या दैनंदिन वापराच्या वस्तूंची विक्री होते.बाबा रामदेव यांच्या या प्रसिद्ध FMCG कंपनी पतंजली फूड्सने आता देशात कमाईचा नवा विक्रम रचला आहे.

{New Income Record By Patanjali Foods} डिसेंबर 2024 मध्ये आणि चालू आर्थिक वर्षाच्या या तिसऱ्या तिमाहीमध्ये पतंजली फूड्सचा निव्वळ एकूण नफा हा 71.29 टक्क्यांनी वाढून आता 370.93 कोटी रुपये झालेला आहे.

तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला  एकूण 216.54 कोटी रुपयांचा नफा मिळाला होता.या आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत पतंजली फुड्स कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 9,103.13 कोटी झालेले आहे,हे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 7,910.70 कोटी इतके होते.

या दरम्यान कंपनीचा खर्चही वाढला असून तो आता  8 हजार 652.53 कोटी इतका झाला आहे.मागील आर्थिक वर्षात हा खर्च 7 हजार 651.51 कोटी होता.त्यात आता मोठी वाढ झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.