दाभा येथे पशुचिकित्सा व वंध्यत्व निवारण शिबिर,584 जनावरांची करण्यात आली  तपासणी.

दाभा येथे पशुचिकित्सा व वंध्यत्व निवारण शिबिर,584 जनावरांची करण्यात आली  तपासणी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

पशुसंवर्धन विभाग बाभूळगाव व रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा  यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23डिसेंबर  रोजी दाभा येथे पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात कार्यक्रमांमध्ये जनावरांची गर्भतपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, बकऱ्याची हगवण व सर्दी खोकला तसेच  तोंडाला जखमा होणे आदी  रोगांवर  उपचार व निदान करण्यात आले. यावेळी गावातील पशुपालक बंधूंना  रिलायन्स फाउंडेशन तर्फे १५ किलो मिनरल मिक्सर चे वाटप करण्यात आले.

पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपाचार हा आलेल्या जनावरांना  करण्यात आला.जनावरांना मुख्यता गोचीड नियंत्रण, गर्भतपासनी व जंत निर्मूलन याकरिता विशेषता उपचार देण्यात आले.  काही जनावरांना गर्भ राहत नसल्यामुळे त्याकरिता विशेष उपचार जनावरांना देण्यात आले. या शिबिरात एकूण ५८४ जनावरांची तपासणी व  लसीकरण उपचार या ठिकाणी पुरवण्यात आले यामध्ये शेळ्या ३४८ तसेच बैल ३० आणि गाई १०२ व म्हैस १०४ अशाप्रकारे सर्व प्राण्यांना सेवा प्रदान करण्यात आली.

या शिबिरात  डॉक्टर क्रांती काटोले  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ ,डॉ. विजय रहाटे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग यवतमाळ , डॉ. प्रशांत झाडे, डॉ. अशोक धूर्वे, पशुधन विकास अधिकारी.  रवी अजमिरे, प्रणव महानुर,  प्रशांत गिड, रुपेश आडे, पशुधन पर्यवेक्षक  रमेश मडावी, परिचर  बाभूळगाव व भगवान काथोटे पशुधन सहायक मैत्री, सौ पुष्पा पेटकूले, पशुसखी,  उमेद यांनी विशेष या शिबिरात परिश्रम रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा चे श्री प्रफुल बनसोड, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + twenty =