Pancard 2.0 : असा मिळेल आपल्या ई-मेल वर PAN 2.0 विनामूल्य.अनेक शासकीय आणि खाजगी कामांमध्ये तसेच बँकिंग किंवा इतर व्यक्तिगत कामांसाठी पॅन कार्ड (परमनंट अकाउंट नंबर) सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची दस्तावेज आहे. गेल्या अनेक वर्षापासून पॅन कार्ड देशात वापरात आणल्या जात आहे आता सरकारने पॅन कार्ड चे नवीन वर्जन PAN 2.0 लागू केले असून या पॅन कार्ड मध्ये आता डिजिटल प्रणालीसाठी विशेष क्यूआर कोड राहणार आहे आणि हा पॅन कार्ड सर्वांना मोफत आणि अर्ज केल्यास व्यक्तिगत ईमेलवर मिळणार आहे. पॅन कार्ड टू पॉईंट झिरो ची नवीन विशेषता काय आहेत ते आपण पाहू या.
नवीन PAN 2.0 ची वैशिष्ट.
केंद्र सरकारने देशात पॅन कार्ड नवीन फिचर्स मध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार नवीन पॅन कार्ड आता मोफत मिळणार असून या PAN 2.0 मध्ये आता QR कोड राहणार आहे.आधीच्या पॅन कार्डपेक्षा अधिक प्रगत, सुरक्षित आणि हे डुप्लिकेशन मुक्त राहावे यासाठी सरकारने लक्ष दिले आहे.विशेष म्हणजे कुणाचाही जुना PAN सुद्धा वापरात राहणार आहे.
CCEA कॅबिनेट समितीने पॅन 2.0 प्रकल्पाला दिली मंजुरी
आयकर विभागाकडून नागरिकांना पुरविण्यात येणारे पॅन कार्ड साठी आता नवीन प्रकल्प आयका विभागाने सुरू केला असून, नागरिकांना मोफत पॅन 2.0 मिळावा यासाठी 25 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यात देशात आर्थिक घडामोडी पाहणाऱ्या कॅबिनेट समिती (CCEA) ने आयकर विभागाच्या पॅन 2.0 प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.त्यामुळे आता सध्याच्या वापरकर्त्यांसाठी पॅन क्रमांक समान राहील,मात्र पॅनकार्ड अपग्रेड केले जाऊ शकेल.यासाठी कोणताही पॅन कार्ड वापरकर्ता किंवा कार्डधारकाकडून कोणतेही शुल्क न लागता पॅन कार्ड अपग्रेड होईल.या पॅन 2.0 मध्ये QR कोड राहणार असून आधीच्या पॅन कार्डपेक्षा अधिक डिजिटल,सुरक्षित आणि डुप्लिकेशन मुक्त राहावा यावर भर देण्यात येत आहे.
नवीन पॅन 2.0 अर्ज साठी हे करा.
आपला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीने प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊ शकेल.नवीन पॅन साठी अर्ज करताना OTP layby च्या पर्याय असेल यावर क्लिक करून रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर प्राप्त झालेला OTP भरून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्ध्या तासात पॅन कार्ड 2.0 आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर फिजिकल मोडमध्ये फिजिकल पॅन कोठे पाहिजे हा पर्याय असेल,जर तुम्हाला फिजिकल मोडमध्ये पॅन कार्ड मिळवायचे असेल तर तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.तर भारताबाहेर पॅन कार्डची डिलिव्हरी लागल्यास यासाठी 15/-रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.या नंतर नोंद केलेल्या ईमेल आयडीवर पॅन कार्ड मोफत मिळेल.यासाठी रीतसर अर्ज करावा लागेल.
ह्या आहेत online steps.
नवीन पॅन कार्ड ज्यात QR कोड असेल हे नवीन पॅन कार्ड मिळविण्यासाठी NSDL च्या अधिकृत https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या वेबसाइटला कॉम्प्युटर किंवा मोबाईल वर उघडावी लागेल.वरील लिंक ओपन केल्यानंतर, या संबंधात सर्व आवश्यक माहिती जसे,पॅन कार्ड, पॅन नंबर माहिती, आधार कार्ड जन्मतारीख इत्यादी आवश्यक माहिती भरून टिक बॉक्सवर क्लिक करताच अर्ज सबमिट होईल.यानंतर स्क्रीन वर एक नवीन वेबपेज उघडेल,ज्यामध्ये आपली माहिती काळजीपूर्वक तपासणी करावी लागेल जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती दिली जाणार नाही.यानंतर OTP layby पर्यायावर क्लिक करताच नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला OTP भरून पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑनलाईन अर्ज होताच अर्धा तासात पॅन कार्ड 2.0 नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविणार.
या अपग्रेड पॅन साठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासात पॅन कार्ड 2.0 नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जाईल.यात फिजिकल मोडमध्ये पॅन कार्ड मिळवायचे असेल तर 50 रुपये शुल्क भरावे लागेल. तर भारताबाहेर पॅन कार्डची डिलिव्हरी आवश्यक असल्यास यासाठी 15 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यानंतर भारताबाहेर विदेशात अपग्रेड पॅन कार्ड फिजिकल मोड मध्ये मिळण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार.