Palestine Solidarity Gathering: पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व इस्रायली अत्याचारांच्या विरुद्ध यवतमाळ येथे झाले भव्य निषेध प्रदर्शन.
Palestine Solidarity Gathering: इजराइल हमास युद्धादरम्यान फिलिस्तीन व गाझा पट्टीवर इजरायल कडून होत असलेले बॉम्ब हल्ले व निष्पाप फिलिस्तीनी नागरिकांवर अत्याचारांच्या विरोधात आज यवतमाळ येथे मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
शुक्रवारच्या जुमाच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाच्या सर्व जमातीची संघटना कुल जमात विफाक द्वारे व त्याच्या नेतृवात स्थानिक कळंब चौकात फिलिस्तिन समर्थनार्थ व इजरायल द्वारे तेथे होत असलेल्या अत्याचार व नरसंहाराचा निषेध व भव्य विरोध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, यात यवतमाळ शहरातील मुसलिम समाजाचे नागरिक, युवक, महिला व मुले मुली मोठ्या संख्येने सामील झाले.
यावेळी फीलिस्तीन च्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात नारेबाजी करीत इस्राएलच्या अत्याचारांचा निषेध नोंदविण्यात आला, या दरम्यान मंचावरून मौलवी शारिक, मुफ्ती एजाज, मुफ्ती सुहैल, जमात ए इस्लामीचे अमीर ए मकामी सय्यद शहाबुद्दीन, आदींनी उपस्थित लोकांना संबोधित करीत इस्राएल द्वारे कश्या प्रकारे फिलिस्तींवर अत्याचार सुरू आहे याचे विस्तत विवेचन केले व मुस्लिमांचे मस्जिद ए अक्सा व फीलिस्तीन चे नातेसंबंध काय आहे यावर प्रकाश टाकला.
या विरोध प्रदर्शनात सर्वांनी हातात फिलिस्तीनच्या समर्थनार्थ पोस्टर व प्ले कार्ड घेवून निष्पाप फिलिस्तीनिंवर होत असलेल्या हलल्यांचा निषेध नोंदवून इस्राएलच्या सर्व प्रॉडक्ट वर बहिष्कार टाकण्याची अपील केली. या दरम्यान मंचावरून आंदोलनाचे सूत्र संचलन काझी निजाम यांनी केले.
यानंतर इस्राएल हमास युद्ध तात्काळ थांबवून शांती प्रस्थापित करावी,स्वतंत्र फिलिस्तीन राष्ट्र घोषित करावा यासाठी भारताचे राष्ट्रपतीना कुल जमात विफाक द्वारे जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत निवेदन पाठविन्यात आले.या निषेध व विरोध प्रदर्शनासाठी कुल जमात वीफाक चे अध्यक्ष डॉ मुजीब शेख, हाफीज अनिस, अमीन खिलजी, मो तारिक साहिर लोखंडवाला, मो चांद, मुश्ताक गौरी, जाफर खान,अली इम्रान,यांच्या सह मुस्लिम समाजातील असंख्य युवकांनी परिश्रम घेतले.