Open Signal App : स्मार्टफोन मध्ये नवीन सिम टाकण्यापूर्वी आपल्या क्षेत्रात कोणत्या टेलिफोन कंपनीचा नेटवर्क मजबूत आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. यासाठी आता कुठेही माहिती घेण्याची गरज नसेल,कारण नुकतेच मार्केटमध्ये लॉन्च झालेला ओपन सिग्नल ॲप यासाठीची मदत करणार आहे.
Open Signal App याचे माध्यमातून विविध एरियामध्ये कोणत्या कंपनीचा नेटवर्क स्ट्रॉंग आहे, आणि सुरळीत टेलिकॉम सेवा मिळू शकते की नाही,याची माहिती या ओपनसिग्नल ॲप द्वारे मिळणार आहे.
तर नवीन सिम खरेदी करण्यापूर्वी किंवा इतर नेटवर्कवर त्याला स्वीच करण्यापूर्वी आपल्या एरियामध्ये कोणता नेटवर्क मजबूत मिळू शकते ,हे जाणून घेण्यासाठी हे नवीन ओपन सिग्नल ॲप कशी मदत करू शकते, हे या माध्यमातून आपण जाणून घेऊया……
सध्या विविध प्रकारचे स्मार्टफोन आणि मोबाईल आले आहे.यात चांगल्या प्रतीचे प्रोसेसर आणि जास्त क्षमतेचा GB दिलेला असतो, यात विविध फीचर असतात.Processor,GB RAM.मात्र स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन चालविण्यासाठी त्यात महत्त्वाचे आहे सिम कार्ड.
कोणत्याही कंपनीचा सिम कार्ड वापरला तरीही, आपल्या एरियामध्ये कोणत्या टेलिकॉम कंपनीची नेटवर्क सुविधा मजबूत आहे याची माहिती नसली, तर असे फोन आणि सिम कार्ड काहीच कामाचे नसते.
चांगल्या कंपनीचा सिम कार्ड खरीदी करून सेवा घेत असल्यास तरी त्या क्षेत्रात नेटवर्क कमजोर असल्यामुळे किंवा कमकुवत नेटवर्कमुळे इंटरनेट स्पीड स्लो चालणे, नेटवर्क नसणे,विविध वेळी कॉल ड्रॉप होणे, नेटवर्क न मिळणे हे समस्या येतात.स्मार्टफोनवर नेटवर्क आणि इंटरनेट सिग्नल बार मजबूत दिसला तरीही टेलिकॉम कनेक्टिव्हिटी चांगली नसते,असा अनेकांचा अनुभव आहे.
जर कोणालाही आता नेटवर्क संबंधी समस्या येत असेल,आणि कुणाचा नेटवर्क आणि कोणत्या एरिया मध्ये नेटवर्क मजबूत आहे हे,जाणून घेण्याचा असेल,आणि नेटवर्क चेंज करायचा असेल,तर नेटवर्क स्टेटस चेक करून घेणे आवश्यक आहे.
आता या ओपनसिग्नल ॲप च्या माध्यमातून बीएसएनएल वोडाफोन आयडिया एअरटेल जिओ कंपन्यांची नेटवर्क कशी आहे हे टेस्ट करणे सोपे झाले आहे.
असे करा या Open Signal App ॲपच्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क स्ट्रेंथ चेक.
- Open Signal App या ओपन सिग्नल ॲप्लिकेशनच्या मदतीने आपल्या क्षेत्रात कोणत्या टेलिकॉम कंपनीचे स्टॉक नेटवर्क आहे,आणि नेटवर्क ऑपरेटर ची माहिती मिळविणे सोपे आहे.
- या एकट्या App च्या मदतीने आपल्या परिसरातील चांगला नेटवर्क असलेला ऑपरेटर कसा निवडू शकतो याची माहिती या ॲप मधून मिळते.
- सर्वात आधी आपल्या स्मार्टफोन मध्ये ओपन सिग्नल एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर,किंवा ॲपल ॲप स्टोअर वरून डाउनलोड करा.
- ओपन सिंगल एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर,याला स्मार्टफोनवर उघडा, आणि त्याचे कंपनीकडून दिलेल्या निर्देशानुसार सेटअप पूर्ण करा.
- या ॲपच्या होम पेजवर कोणत्या कंपनीचे ऑपरेटर आणि त्याचे नेटवर्क मजबूत आहे,या संबंधात ऑप्शन दिसतील.
- यातून नेटवर्क या ऑप्शन साठी निवड करा.
- येथे आपल्या परिसरातील सर्व ऑपरेटर नेटवर्क मध्ये कुणाचा मजबूत नेटवर्क आहे हे लगेच दिसून येईल.
हे आहेत ओपन सिग्नल एप्लीकेशन चे फायदे.
आपल्या स्मार्टफोनमध्ये ओपन सिग्नल एप्लीकेशन असला, तर याच्या मदतीने मोबाईल मध्ये इंटरनेट डाटा आणि त्याची स्पीड सोबतच वायफाय प्रणालीची स्पीड चेक करता येईल.
या ॲपवर नेटवर्क ऑपरेटर्सची क्वालीटी नेटवर्क क्षमता, आणि नेटवर्क स्ट्रेंथ दाखविणारा मॅप सुद्धा उपलब्ध आहे.
या ॲपच्या माध्यमातून बीएसएनएल,जि, एअरटेल वोडाफोन आयडिया,आणि इतर टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्कची तुलना आपण करू शकतो.
सोबतच ओपन सिग्नल एप्लीकेशन माध्यमातून आपला मोबाईल कोणत्या नेटवर्क सोबत कनेक्ट आहे,हे देखील समजते.
नवीन सिम घेण्यापूर्वी करा नेटवर्क टेस्ट.
आपल्या फोनसाठी जर तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यावयाचा आहे, किंवा किंवा इतर टेलिकॉम कंपनीच्या सेवेसाठी आपला सिम पोर्ट करावयाच्या आहे, तर यासाठी आता लॉन्च झालेला ओपन सिग्नल हा एप्लीकेशन फार उपयुक्त ठरू शकतो.याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील दूरसंचार सेवेची उत्तम कनेक्टिव्हिटी नेटवर्कची strength आणि नेटवर्क ऑपरेटर निवडता येणे सोपे आहे.