Online Scam: तरुणाची 6.57 लाखानी ऑनलाईन फसवणूक.

Online Scam: तरुणाची 6.57 लाखानी ऑनलाईन फसवणूक.

Online Scam: रेल्वे तिकीट आरक्षणासाठी पेटीएम अँपचा वापर करणाऱ्या एका 23 वर्षीच तरुणाच्या बॅक खात्यातून सुमारे 6 लाख 57 हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या दिवशी ऑन लाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दि २४ ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस स्टेशन ला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश धनंजय भोजनकर वय 23 वर्ष रा. सिध्देश्वर वार्ड बोरबन उमरखेड असे फसवणूक झालेल्या तरुणांचे नाव आहे.

दिलेल्या फिर्यादी नुसार फीयादी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे मेडीकल ईलेक्ट्रानिक शिकत असुन पुढील शिक्षण करीता इंडाला कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कल्याण मुबई येथे बी ई.आय टी . शाखेत दुस-या वर्षात प्रवेश घेतला आहे बी ई. ला ऑडमीशन घेत असतांना. दिनांक 02/08/2023 ते दिनांक 01/09/2023 पर्यत सतत मोबाईल वर बी ई. ऍडमीशन साठी चांगले कॉलेज ऑलनाईन शोधत होतो.

पंरतु 29 ऑक्टो रोजी औरंगाबाद वरुन नांदेड जाणे करीता त्याने मोबाईल वरू रेल्वेची अधिकृत वेबसाईड वरुन तीकीट बुक केले . ऑलनाईन पैसे भरणे करीता PAYTM हया ऑप वापरला व पेमेन्ट करीत असतांना ऐरर येत होता त्यावेळी त्यांनी बॅक खालचाचे स्टेटमेंन्ट पाहिले बँक खात्यात 662800 रूपये होते त्यापैकी फक्त 5000 रूपये दिसले त्यावेळी खात्यातील रक्कम कुठे गेली पाहत असतांना बँक खात्यातुन वेगवेगळ्या दिवशी सहमती नसतांना -कींवा ट्राझेक्शन केले नसतांना खात्यातुन 657800 रूपये वळते झाल्याचे दिसुन आले.

या घटनेनंतर त्याने उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात एपीआय भरत चपाईतकर करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 17 =