One Nation One Election : भाजप गडकरी आणि सिंधिया यांना नोटीस देणार का ? नेमकं प्रकरण काय ?

One Nation One Election : भाजप गडकरी आणि सिंधिया यांना नोटीस देणार का ? व्हीप असताना ही ONOE विधेयकवेळी भाजपचे 20 खासदार गैरहजर ?

One Nation One Election वर मंगळवारी केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत विधेयक मांडले. या कालावधीत झालेल्या मतदानात 269 जणांनी प्रस्तावाच्या बाजूने तर 196 जणांनी विरोधात मतदान केले.मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीचे दोन मंत्री लोकसभेत गैरहजर होते.ते म्हणजे केंद्रीय परिवहन भुतल मंत्री नितीन गडकरी आणि दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया.आता या दोन्ही मंत्र्यांना भाजप हायकमांड नोटीस पाठवू शकते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ‘वन नेशन वन इलेक्शन’ (ONOE) विधेयक मांडताना सभागृहात उपस्थित नसलेल्या लोकसभा सदस्यांना भाजप नोटीस पाठवेल. या मध्ये गिरीराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नावांचाही समावेश आहे.

भाजपचे 20 खासदार संसदेत होते गैरहजर.

मंगळवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले, तेव्हा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सीआर पाटील यांच्यासह सुमारे 20 भाजप खासदार अनुपस्थित होते.यामुळे केंद्रीय राजकीय वर्तुळात एक नवी. चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान राष्ट्रीय वृत्त एजंसी एएनआय ने जारी केल्या या संदर्भात वृत्तानुसार भाजपचे खासदार शंतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बी वाय राघवेंद्र, विजय बघेल, उदयराजे भोसले, जगन्नाथ सरकार, जयंत कुमार रॉय, व्ही. सोमन्ना, चिंतामणी महाराज हे सुद्धा विधेयक सादर करताना सभागृहात उपस्थित नव्हते.

विधेयक सादर करण्यापूर्वी काढला होता व्हीप.

संसदेत व नेशन वन इलेक्शन वर विधेयक मांडण्यापूर्वी भाजप पक्षाकडून संसदेत हजर राहणे संदर्भात जारी केला होता.त्यामुळे भाजपने लोकसभा सदस्यांना पूर्वीच जारी केलेल्या तीन ओळींचा व्हिप न पाळल्याबद्दल आता या खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण या व्हीपमध्ये. भाजपच्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना या दरम्यान लोकसभेत विधेयक मांडताना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.यानंतरही अनेक खासदार गैरहजर राहिले.

गैरहजेरीचे कारण स्पष्ट नाही.

एएनआय या वृत्तसंस्थेने पक्षाच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जे खासदार उपस्थित नव्हते,त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांच्या अनुपस्थितीची माहिती पक्षाला दिली होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

seventeen + three =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.