संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय ठीय्या आंदोलन.

संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय ठीय्या आंदोलन.

बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब

महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचारिकावरील होणाऱ्या आर्थिक व मानसिक अन्याय विरोधात व संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बाभुळगाव पंचायत समितीच्या आवारात  दिनांक 20नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व   संगणक परिचालकांचा आकृतीबंधात समावेश करून वेतन महिन्याच्या निश्चित तारखेस देण्यात यावे.

आकृतीबंधात समाविष्ट करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक 20 हजार रुपये पर्यंत वेतन सद्यस्थितीत देण्यात यावे. नियमबाह्य कामे लावताना संदर्भीय पत्रानव्ये ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा. सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत दिलेले टार्गेट सिस्टीम पूर्णपणे बंद करण्यात यावी.येता दिवाळी सणापूर्वी मागील दोन महिन्याचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्यात यावे.

अशा मागण्या असून या मागण्या संदर्भात  मंत्री महोदयांनी हिवाळी अधिवेशन दिनांक  22 डिसेंबर 2022 रोजी लेखी आश्वासन दिले होते.ग्राम विकास मंत्री यांच्या निवासस्थानी 1 जानेवारी 2023 रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते. तसेच ग्राम विकास मंत्री यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथी गृहात दि.13 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन केवळ बैठकीपूरतेच मर्यादित  राहिले.

या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.असा आरोप  कर्मचाऱ्यांचा आहे.परिणामी महाराष्ट्रातील सर्व संगणक परिचालक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.  जर मागण्या मंजूर न झाल्यास 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र भर जिल्हा परिषद कार्यालय समोर धरणे आंदोलन दि.4 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा सदस्य यांच्या निवास समोर धरणे आंदोलन वह 11 डिसेंबर रोजी हिवाऴी अधिवेशन नागपुर येथे भव्य मोर्चा व मांगण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 12 =