भाऊबीज निमित्त Bhai Aman यांचे कडून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक किटचे वाटप.

यवतमाळ -: भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो.शेतकरी कुटुंबाची स्थिती दिवसेंदिवस फार चिंताजनक होत आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे. यावर्षी सरासरी एकरी २ ते ३ क्विंटल कापूस झाला तसेच सोयाबीन सुद्धा हातातून निघून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण १३० शेतकरी आत्महत्या झाल्या. यातील यवतमाळ तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना त्यांची भाऊबीज गोड व्हावी याकरिता बाह्यमन यांचे कडून त्यांना भाऊबीजेच्या पूर्वदिनी जीवनावश्यक ची वाटप केले यामध्ये जवळपास २७ कुटुंबांना त्यांनी आपल्या ‘खिदमत ए खल्क” या जनसंपर्क कार्यालयात किटचे वितरण करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या उपक्रमासाठी युवा जागर ट्रस्ट यवतमाळचे किशोर बाबुळकर यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा सदैव दानदात्याची भूमिका बजावणारे Bhai Aman यांना तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची माहिती दिली व त्यांना मदतीची गरज असून शक्य ती मदत ती आपण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली भाई अमन यांनी लगेचच त्यांची मागणी मान्य करून त्यांना भाऊबीजेच्या पूर्वदिनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत केली.

यावेळी भाई अमन सह डॉ. गणेश नाईक, सुकांत वंजारी, मोनु शेख, नाझीम शेख,अजय ठाकूर, समीर शेख यांचे सह अनेक जण उपस्थित होते तसेच या मदतीसाठी भाई अमन व फेंड्स ग्रुप यांनी प्रतिसाद देऊन मदत केल्याबद्दल युवा जागर ट्रस्ट यवतमाळ तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.राहुल दाभाडकर,सामजिक कार्यकर्ते किशोर बाभुळकर अध्यक्ष युवा जागर ट्रस्टचे अर्पित शेडमाके सचिव शुभम कंगाले आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

four × 3 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.