राज्य कर्मचाऱ्यांच्या Old Pension Scheme मागणी साठी अजितदादा सकारात्मक.

राज्य कर्मचाऱ्यांच्या Old Pension Scheme मागणी साठी अजितदादा सकारात्मक.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी Old Pension Scheme लागू करण्याच्या मागणी साठी गेल्या बऱ्याच काळापासून संघर्ष करीत आहे,आपल्या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनेने १२ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने नागपूर येथे भव्य आंदोलन पुकारले होते,त्यांच्या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांनी उपस्थित लाखो राज्य कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

यावेळी पुंजानी यांनी सांगितले की, राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अजितदादा पवार साहेब यांचा केव्हाच विरोध नव्हता व पुढे नाही,राज्याचे मुख्यमंत्री मा शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.फडणवीस साहेब सुद्धा जुनी पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सकारात्मक विचार करणार असून आज मा.अजितदादांनी याबाबत सदन मध्ये स्पष्टपणे बोलले आहेत,अशा प्रकारचे प्रतिपादन पुंजानी यांनी केले.

यावेळी श्रीमती सोनालीताई ठाकूर राकापा पक्ष निरीक्षक अमरावती व महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी नितेश खांडेकर राज्य अध्यक्ष जूनी पेन्शन योजना महाराष्ट्र, सुनील घुढे राज्य सदस्य,अशितोष सिर राज्य प्रवक्ता,निलेश कानडे जिल्हा अध्यक्ष जूनी पेन्शन योजना वाशिम, इकराम खान अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष वाशिम,गोपल लोखंडे विभागीय सदस्य यांचे सह राज्यातील लाखो कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − six =