OLA S1 Pro Gen 3 Scooter : भारतात ओला कंपनीकडून 3 नव्या मोटरसायकल दाखल होणार असल्याची घोषणा या कंपनीने केली,मात्रयापैकी एक ही मोटरसायकल जानेवारी महिन्यापर्यंत लाँच झालेली नाही,त्यामुळे भारतात या मोटरसायकलींची ची डिलिव्हरी सुरू होऊ शकली नाही.
यात सर्वात जास्त चर्चा Ola Roadster motorcycle ची खूप चर्चा होती.तो सुद्धा भारतात दाखल झाली नाही मात्र यापूर्वीच Ola कडून जानेवारी 2025 मध्येच Ola S1 Pro Gen1, आणि Gen2 ही मोपेड स्कूटर लाँच झाली.पण याला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही.यानंतर आता Ola S1 Pro Gen3 ही लाँच करण्यात आली आहे.
यापूर्वी ओला कंपनीने धूम धडाक्यात ओला एस वन प्रो ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली होती.मात्र या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये अनेक समस्या असल्याने याच्या खूप चर्चा झाल्या.त्यामुळे भारतात विविध ठिकाणी Ola Service Center’s बाहेर हजारो ओला स्कूटर धुळ खात पडलेल्या आहेत.
तर दुसरीकडे ओला कंपनीला आपल्या स्कूटरमध्ये आलेल्या समस्या दूर करता आल्या नाही.मात्र या कंपनीने आपल्या याच जेनरेशन मधील तिसरी स्कूटर गेन3 मध्ये इंजीनियरिंग सिस्टम बदलून टाकला आहे.
यामुळे या वाहनात कमी समस्या येतील असे ओलाने गृहीत धरले,असून 31 जानेवारीला Ola S1 Gen 3 ही स्कूटर लॉन्च केली आहे.
रोडस्टर मोटरसायकलचे डिलिव्हरी निश्चित तारीख सांगितली जात नाही.
भारतात आता ओलाच्या तीन मोटरसायकली येणार अशी घोषणा कंपनी करीत करताना जानेवारी 2024 मध्ये ओला रोडस्टर मोटरसायकलचे डिलिव्हरी सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र ती शक्य झाली नाही.दरम्यान डिसेंबर 2024 पर्यंत ओला मोटरसायकल आणि स्कूटर विक्री प्रक्रिया सुरू करून बुकिंग सुरू झाली होती.
Ola Headquarter मध्ये आणि Ola वेबसाईटवर, ऍप वर भेट देणाऱ्यांची संख्या वाढली,आणि कंपनीच्या फ्रेंचाईजी ऑफिसला मोठ्या प्रमाणात फोन केल्या जात आहे. तेथे ओला रोडस्टर लवकरच डिलिव्हरी साठी उपलब्ध होईल असे आश्वासन दिले जात आहे.मात्र याची निश्चित तारीख सांगितली जात नाही, ही वास्तविक परिस्थिती आहे.
OLA S1 Pro G3 E Scooter New Features
- आता ओला कंपनीने Ola S1 Pro G3 E Scooter बनविली आहे. अर्थातच जुन्या स्कूटर सिस्टम इंजीनियरिंग मध्ये कंपनीने बदल केले आहे.
- यामध्ये मॅग्नेट नसलेली मोटर लावण्यात आली आहे.
- ओलाची ही नवी स्कूटर अधिक Torc जनरेट करणार आहे.
- यामुळे वाहनाचा मायलेज परफॉर्मन्स वाढणार आहे,असा Ola ने दावा केला आहे.
- या वाहनात ओलाने जी बॅटरी लावली आहे त्यात 4680 सेल वापरला आहे. यामुळे
- बॅटरीची ऊर्जा साठविण्याची कॅपॅसिटी 10 टक्क्यांनी वाढणार आहे.
- सेंसर सिस्टम आणि वायरिंग सुद्धा कमी केली.
OLA S1 Pro Gen 3 Scooter : सेंसर सिस्टम आणि वायरिंग सुद्धा कमी करण्यात आली.
ओलाच्या या नवीन जनरेशनच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सेंसर सिस्टम आणि वायरिंग सुद्धा कमी करण्यात आली आहे.बॅटरी पॅक ला जोडून याची Motor आणि ECU देण्यात आला आहे. यात मल्टी कोर प्रोसेसर सुद्धा वापरण्यात येत आहे. यामुळे या ई स्कूटर ला चांगला मायलेज मिळणार आहे.
ही स्कूटर MOVE OS 5 तंत्रज्ञान वर आधारित आहे. एकूणच या स्कूटरचे काही डिझाईन बदलले नसले तरीही अंतर्गत खूप बदल करण्यात आले आहेत.नव्या स्कूटरची फ्रेम स्टील ऐवजी अल्युमिनियमची बनविण्यात आली आहे.यामुळे स्कूटरचे वेट कमी झाले आहे.
तिच्या प्लॅटफॉर्म इतर मोटरसायकली स्कूटर पेक्षा डिफरंट बनविण्यात आला आहे. एकूणच याचा प्लॅटफॉर्म आता ओला कंपनी वेगवेगळ्या मॉडेलच्या स्कूटर बनविण्यासाठी वापरणार आहे.