ओबीसींचा एल्गार मेळावा नरसीलाच होणार – Avinash Bhosikar

ओबीसींचा एल्गार मेळावा नरसीलाच होणार – Avinash Bhosikar

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणारा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याने मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात येत आहेत. कुणीही आणि कितीही व कशाही अफवा पसरवू द्या. एल्गार मेळावा तर नरसीलाच आणि दि. ७ जानेवारी २०२४ होणारच असल्याचे मेळाव्याचे संयोजक अविनाश भोसीकर यांनी ठामपणे सांगितले आहे.

मागच्या पिढीने संघर्ष करुन मिळवलेले टिकवण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे मेळावा यशस्वी करण्याची जबाबदार समस्त ओबीसी समाजावर असल्याने या मेळाव्याच्या पुर्व तयारीची बैठक नायगाव येथील मार्कण्डेय मंदिरात शुक्रवारी दि.२२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी संयोजक अविनाश भोसीकर हे उपस्थित होते तर महेंद्र देमगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना अविनाश भोसीकर यांनी राजकीय नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यात ६० टक्के असलेल्या ओबीसी समाजाने मतदान करुन मराठा समाजाच्या नेत्यांना आमदार खासदार केले पण ते ओबीसीच्या हक्काबात एकही नेता तोंड उघडायला तयार नाही. मराठा नेते ओबीसीत घुसखोरी तर करतच आहेत पण संविधानाच्या बाहेर जावून मागण्या करत आहे.

ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात एकवटला असल्याने नरसी येथील छगन भुजबळ यांची एल्गार सभा ऐतिहासिक होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आला असून भुजबळांची सभा होवू नये किंवा पुढे ढकलण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करत असून यात त्यांना अश आले नसल्याने आता वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत.

कोणीही आणि कितीही व कशाही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाही ओबीसींची एल्गार सभा ही ठरलेल्या तारखेला म्हणजेच दि. ७ जानेवारी २०२४ रोजी आणि नरसी येथेच होणार असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी सुर्यकांत सोनखेडकर, एल.डी. कोंडावार, गुरुनाथ सालेगावे, दत्तात्रय आईलवार, धनराज शिरोळे, माधव चिंतले, बालाजी तुप्पेकर, नगरसेवक विठ्ठल बेळगे यांनी समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रभाकर लखपत्रेवार यांनी केले.सदरची बैठक यशस्वी होण्यासाठी नायगाव शहरातील व तालुक्यातील तरुणांनी परिश्रम घेतले त्यामुळे नायगाव तालुक्यातील ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 12 =