नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयाची गाथा.दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त.

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयाची गाथा.दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

ठळक मुद्दे

दस्तनोंदणीसाठी असुविधा, अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त.

दारव्हा – आज आमच्या प्लॉटची सकाळी दहा वाजता दस्तनोंदणी होती. वाईंडरने नऊ वाजताच बोलविले होते. आम्हाला एक तास उशीर झाला. कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्याने पुढे नंबर येण्यासाठी तीन वाजले. भुकेने जीव व्याकूळ झाला होता. कार्यालयात पाणी नाही, बसण्यासाठी धड जागा नाही.

बाथरूमची व्यवस्था नाही. बाहेर ऊन… अशा त्रासामुळे सदनिका घेतल्याच्या आनंदापेक्षा त्रासच अधिक झाला. हा आहे, राम चव्हाण (नाव बदलले आहे) यांची प्रतिनिधिक प्रतिक्रिया.असाच काहीसा अनुभव दस्तनोंदणीसाठी/खरेदीसाठी येणाऱ्या दारव्हेकरांना व तालुक्यातील लोकांना येत आहे.

अनेकदा सर्व्हअर डाउन होतो, अथवा स्लो झाला, की तुमचा नंबर येण्यासाठी किती वेळ लागले हे सांगता येत नाही. दस्तनोंदणी शुल्कापोटी लाखो रुपये महसूल सरकारला आम्ही मिळून देतो, परंतु साधी पिण्याच्या पाण्याची आणि बाथरूमची व्यवस्था करता येत नाही, यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे, असे त्या व्यक्तीने सांगितले.रोज कार्यालयात किमान पंधरा ते विस दस्तांची दररोज नोंदणी होते.

खरेदीदार आणि विक्री करणारे आणि असे एका दस्तनोंदणीच्या वेळी किमान चार ते पाच जण कार्यालयात येतात,मूल्यांकन काढण्याकरिता, जुन्या खरेदीची नक्कल काढण्याकरिता किमान दिवसभरात शंभर ते दोनशेहून अधिक नागरिक येत असतात. प्राथमिक सुविधादेखील या कार्यालयांमध्ये नसल्यामुळे त्याचा प्रचंड मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

नागरिकांच्या तक्रारी एकीकडे, तर दुसरीकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने अनेकदा शिक्के मारणे, स्कॅनिंगसाठी मदत करणे अशी अनेक कामे नागरिकांना किंवा कार्यालया बाहेर बसणाऱ्या वाईंडरला करावी लागतात.दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जातो.

दिवसभर नागरिकांना थांबावे लागते.कोणतीही चांगली ‘सिस्टीम’ नाही.अनेकदा साहेब उशिरा येतात दुसरा पर्याय नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो.महसूल सरकारला मिळतो, पण असे असतांनादेखील पुरेशा सुविधा देणे राज्य सरकारला शक्य का होत नाही? असा संतप्त सवाल दस्तनोंदणीसाठी/खरेदीसाठी, मूल्यांकनासाठी व नक्कल काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − four =