गाव तिथे राष्ट्रवादी उपक्रम राबवून जिवती तालुक्यात बूथ शाखा निर्माण करा – Nitin Bhatarkar
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*
चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यायचेठिकाणी तालुकास्तरीय राष्ट्रवादी काँग्रेसचे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष Nitin Bhatarkar प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सहसचिव आबिद अली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक महेंद्र चंदेल राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रंजनाताई पारशिवे अल्पसंख्यांकजिल्हाध्यक्ष जहीर खानइत्यादी यावेळी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकेला असलेल्या जिवती तालुक्यातअजितदादा पवारयांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये प्रवेश घेतला यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक जनकल्याणकारी योजनेचाप्रसार प्रचार गावापर्यंत पोहोचविण्यासाठी व अखेरच्या घटकाला लाभ पोहोचण्यासाठी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन.
गाव तिथे शाखा व योजनेचा प्रसार करावा यामुळे या भागात यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होतं आपण अनेक ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवलेला आहे यापुढे महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यानुसार आपल्या पक्षाचं बळ आणि संघटन वाढविण्यासाठी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कार्य केल्यास कार्याची संधी आपल्याला नक्की मिळणार आहे.
यावेळी आबिद अली यांनी जिवती तालुक्यात वन जमिनीघरकुलाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे यासाठी जिल्हा पदाधिकारी सह शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवण्याचा पक्षाच्या वतीने प्रयत्न करू शासनाने आरोग्य विभागाच्या आयुष्यमान योजना लेक लाडकी योजना यासह शेतकऱ्यांच्या आदिवासी करीता अनेक योजना शासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या त्याचबरोबर अनेक महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे वाढते तापमान जमिनीची होत असलेली धुप यामुळे शेतीतील उत्पादनावर झपाट्याने घट होत असल्याने शेतकरी हतबल झालेले आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बांबू लागवड योजनेसाठी रोजगार हमी योजना.
दिवासी विकास योजना यासह अटल बांबू मिशन योजना या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व जमिनीची सुपीकता पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी हेक्टरी सात लाख रुपये अनुदान सिंचन विहिरीच्या सुविधा उपलब्ध झाल्याने विशेषता अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून विजय गोतावळे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बबलू राठोड तालुका युवा राष्ट्रवादीचे सचिव म्हणून राम कोडापे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष म्हणून वैजनाथ सूर्यवंशी अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष म्हणून गफार मुन्ना निजाम शेख तर तालुकातील नितीन पवार,गणेश बखाडे यांनाही कार्यकारणी मध्ये निवड केल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी सौ. रंजनाताई पारशिवे यांनी महिला धोरणाबाबत माहिती दिली यावेळी महेंद्र चंदेल यांनी पक्षाच्या कार्यामध्ये पदाधिकाऱ्यांनीवेगवेगळे उपक्रम राबवून पक्षाचा कार्यक्रम जनतेपर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले यावेळी संचलन विजय गोतावळे यांनी तर आभार नितीन पवार यांनी मांडले त्यावेळेस तालुक्यातील बऱ्याच संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.