निंगनुर येथे गळफास घेऊन शेतकरी युवकाची आत्महत्या.

ढाणकी: निंगनुर येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातील कुंभीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताचे सुमारास आढळून आली . विजय केशव भोळे वय अं ३० वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःच्या नावाने ३ एकर शेती आहे.

नेमकेच लग्नाला ७ महिने झाले होते त्याच्या कुटूंबात आई वडील भाऊ पत्नी बहिण असा परिवार आहे. घटनेबाबत माहिती मिळताच बिटरगाव पो.स्टे च्या ठाणेदार सुजाता बनसोड व निगंनुर बीट जमादार देविदास हाके पो.का दत्ता कुसराम यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शवविचवेदनासाठी प्रेत प्राथमिक आरोग्य केन्द्र ढाणकी येथे पाठविण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या अल्प भुधारक शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे कारण समजु शकले नाही तरीही दिवाळी सणाच्या वसुबारस या पहिल्या दिवशीच ही शेतकरी पुत्राची आत्महत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

20 + eighteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.