New Rules ATM Transactions : जाणून घ्या, आता ATM वापरताच खिश्यावर किती पडणार पैशांचा भार !

New Rules ATM Transactions : आज-काल ऑनलाईन आणि डिजिटल पेमेंट सिस्टम मुळे बँक आणि बँक ग्राहकांचे काम सुविधाजनक झाले आहे. यात एटीएम (ऑटोमॅटिक मनी ट्रान्सफर मशीन) ATM.दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी सर्वसामान्य लोकांकरिता महत्त्वाचे साधन आहे.

बँकांकडून आपल्या बँक ग्राहकांसाठी आणि इतर बँकिंग ग्राहकांसाठी एटीएम मधून पैसे काढण्याची आणि सीडीएम प्रणालीतून बँकेत पैसे जमा करण्याची सुविधा सर्वत्र उपलब्ध झालेली आहे. मात्र सर्व बँका एटीएम सर्विस देताना आपल्या ग्राहकांकडून यासाठी चार्जेस आकारतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

ATM Service.आता यात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. ग्राहकांना आता एटीएम चा वापर करताना बँकांना वाढीव शुल्क आता करावा लागेल.देशाच्या शिखर बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया ने आता एटीएम मधून पैसे विड्रॉल करण्यासाठी जो चार्ज लागतो त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI New Rule For ATM Transaction.आतापर्यंत विविध बँकेतील ग्राहकांना एटीएम कार्डद्वारे एटीएम मशीन मधून पैशांचे ट्रांजेक्शन साठी फार कमी चार्जेस लागत होते.आता आरबीआयच्या या निर्णयामुळे एटीएम चार्जेस मध्ये वाढ होणार आहे.

नुकतेच या संबंधात आरबीआय ने आपला निर्णय घेतला आहे. आणि लवकरच हे वाढीव चार्जेस ग्राहकांना ATM Service साठी भरावे लागेल. आता पुढे एटीएम ट्रांजेक्शन साठी बँक ग्राहकांना किती चार्ज भरावा लागेल या संबंधात आपण जाणून घेऊया.

चार्जेस लवकरच वाढणार आहे.

देशात विविध बँकांच्या एटीएम मधून कॅश काढण्याची सुविधा आहे. देशभरातही ऑनलाईन कॅश ट्रांजेक्शन प्रणाली चा नागरिक लाभ घेतात.बँकिंग सेक्टरमध्ये अशी सुविधा बनविण्यात आलेली आहे की, कोणत्याही बँकेचा एटीएम धारक ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून आपल्या खात्यातून पैसे काढू शकतो.Bank Account Cash Withdrawl From ATM.

आतापर्यंत बँक ग्राहकांना एटीएम चा वापर करताना कॅश ट्रांजेक्शन साठी फार कमी चार्जेस अदा करावे लागत होते, मात्र आता हे चार्जेस लवकरच वाढणार आहे.आरबीआयने या संदर्भात आता पुढे एटीएम ट्रांजेक्शनसाठी बँक ग्राहकांना किती वेळा ट्रांजेक्शन केले तर किती चार्ज भरावा लागेल याबाबत RBI निर्देशावरून गाईडलाईन बनविणार आहे.

आरबीआयकडून एटीएम ट्रांजेक्शन सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा महत्त्वाचा अपडेट आहे. यापुढे आता एटीएम मशीन मधून रक्कम काढणे महाग होणार आहे. आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे बँकांकडून आता एटीएम सुविधेसाठी ग्राहकांकडून अधिक चार्जेस लागणार आहे.

याचा असा अर्थ आहे की, एटीएम कार्डद्वारे मशीन मधून विड्रॉल करण्याची सुविधा घेताना बँक ग्राहकांच्या खिशावर अधिक भार टाकणार आहे. या संदर्भात नुकतेच आरबीआयला ATM चार्जेस वाढविण्याचा प्रस्ताव आणि सूचना NCPI ने दिली आहे.रिझर्व बँक ऑफ इंडिया ने एटीएम सुविधा शुल्क आकारणी संदर्भात आपली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे.

आता 5 फ्री ट्रांजेक्शन नंतर 22 रुपये चार्ज अदा करा.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यापूर्वीच आरबीआयला बँकांच्या एटीएम ट्रांजेक्शन वर बँक ग्राहकांकडून चार्ज शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

त्यानंतर आरबीआयने या संदर्भात जे निर्णय घेतले आहे,त्यात आता बँक ग्राहकांना आपल्या बँक एटीएम कार्डचा वापर करताना एटीएम मधून 5 फ्री ट्रांजेक्शन केल्यानंतर जर पुन्हा त्याच महिन्यात ATM कॅश विड्रोल केल्यास किमान 22 रुपये चार्ज आकारण्यात येईल.यापूर्वी 5 फ्री ट्रांजेक्शन नंतर 21 रुपये चार्ज लागत होते.यात आता एक रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

एकूणच 22 रुपयांचे हे चार्जेस प्रति पाच फ्री ट्रांजेक्शन मर्यादेनंतर अधिक एटीएम व्यवहारांवर लागू होणार आहे.

ATM इंटरचेंज फीस 2 रुपये वाढणार.

याशिवाय एटीएम इंटरचेंज फीस देखील वाढविण्याची तयारी आरबीआयकडून सुरू आहे.यासाठी आरबीआय आणि एनपीसीआय सध्या एकत्रितपणे निर्णय घेण्यासाठी काम करीत आहे. नुकतेच एनपीसीआयने आरबीआयला एटीएम इंटरचेंज फीस वाढविण्याची सूचना केली आहे.

त्यानुसार आता एटीएम मधून कॅश काढण्यावर इंटरचेंज फीस 2 रुपये वाढवून 17 रुपये वरून आता 19 रुपये करावी,आणि ऑनलाईन ट्रांजेक्शन साठी असलेला 6 रुपयांचा चार्ज आता 7 रुपये करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.

नेमके काय आहे एटीएम इंटरचेंज फीस.

जेव्हा बँक ग्राहक आपला एटीएम कार्ड कॅश विड्रॉल करण्यासाठी इतर बँकेच्या एटीएम चा वापर करतो,त्याला एटीएम इंटर चेंज असे म्हटले जाते.

आपल्या बँकेचा एटीएम दुसऱ्या बँकेच्या एटीएम मध्ये वापरल्यास अशा परिस्थितीत एटीएम इंटरचेंज फीस आकारण्यात येते. प्रामुख्याने हा चार्ज एटीएम ट्रांजेक्शन फीस म्हणूनच ग्राहकांच्या बँक खात्यातून वसुल केला जातो.

New Rules ATM Transactions : या ठिकाणी लागू होणार हे नवीन नियम.

या संदर्भात माध्यमांमध्ये एमपीसीआयच्या प्रस्तावासंदर्भात विविध रिपोर्ट प्रसारित केल्या जात आहे. आणि यात एनपीसीआयचा हा प्रस्ताव सुद्धा योग्य मानल्या जात आहे. बँका आणि एटीएम ऑपरेटर संचालन करणाऱ्या बँकांच्या यंत्रणाही एनपीएसीआयच्या या प्रस्तावाशी सहमत आहेत.

त्यामुळे आता एटीएम मधून फ्री ट्रांजेक्शन मर्यादेनंतर कॅश विड्रॉल करण्यावर हा वाढीव शुल्क देशातील महानगरांपासून लहान शहरापर्यंत आणि ग्रामीण भागातील एटीएम सिस्टम वर लागू होईल.ATM Charges. नुकतेच या संदर्भात एनपीसीआय आणि आरबीआयच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीतून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

बँकिंग क्षेत्राचा खर्च एटीएम ट्रांजेक्शन सिस्टममुळे वाढल्याने चार्ज वाढविण्याची IBA ची सिफारिश.

यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने यापूर्वी भारतीय बँक संघटनेच्या (IBA) चे चे मुख्य कार्यकारी अधिकारी एसबीआय आणि देशभरातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी HDFC Bank अधिकाऱ्यांची एक संयुक्त कमिटी बनविली होती, या कमिटीने बँकिंग क्षेत्राचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने एटीएम ट्रांजेक्शन वर चार्ज वाढविणे आवश्यक असल्याची शिफारिश केलेली आहे.

एटीएम ऑपरेट करण्याचा खर्च वाढल्याने चार्ज वाढणार

देशभरात विविध बँकांकडून आपल्या एटीएम संचालन साठी एटीएम ऑपरेटर्स आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ञांची मदत घेतली जाते.बँकिंग सेक्टर मधील तज्ञांचे मते मागील काही वर्षात बँकांना आपले एटीएम ऑपरेट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.

वाढत्या महागाईमुळे एटीएम मध्ये पैसे टाकण्याच्या प्रणालीत खर्च वाढला आहे. देशातील ग्रामीण क्षेत्र आणि उपनगरीय भागांमध्ये एटीएम ऑपरेटिंग आणि मेंटेनन्स खर्च खूप वाढला आहे.

उल्लेखनीय म्हणजे एनपीसीआय आणि आरबीआय ने एटीएम विड्रॉल चार्जेस वाढविण्याच्या निर्णयासंदर्भात सध्या अधिकृत माहिती सार्वजनिक केलेली नाही.मात्र आरबीआयचे या संदर्भात निर्देश जारी होताच, एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना आपल्या ट्रांजेक्शन वर आता वाढीव शुल्क द्यावा लागणार अशी शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

3 + thirteen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.