New Districts In Maharashtra 2025 : महाराष्ट्रात प्रस्तावित 21 नवीन जिल्ह्यांची 26 जानेवारीला घोषणा होणार?

New Districts In Maharashtra 2025 : महाराष्ट्रात प्रस्तावित नवीन जिल्ह्यांच्या यादीला अखेर शासनाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.महाराष्ट्रात 21 नवीन जिल्हे बनविण्याच्या प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे,त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे,अशी माहिती सरकारमधील असलेल्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेली आहे.

New 21 District In Maharashtra त्यामुळे महाराष्ट्रातील नकाशावर राज्यातील जुन्या जिल्ह्यात असलेले अनेक तालुके आता नवीन जिल्हे म्हणून अस्तित्वात येणार आहे.महारष्ट्र सरकार लवकरच कॅबिनेट मंजुरी Cabinet Of Maharashtra देवून राज्यात या नवीन 21 जिल्ह्यांची  घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांची संभाव्य घोषणा?

महत्त्वाचे म्हणजे या महिन्यातच आणि येत्या 26 जानेवारी 2025 रोजी सरकारकडून या नवीन जिल्ह्यांची (New Districts In Maharashtra 2025) घोषणा होऊ शकते.कारण सरकारकडे राज्यातील 4 विभागात जो नवीन तालुके आणि जिल्हे प्रस्ताव आहे त्यानुसार महाराष्ट्रात 21 नवे जिल्ह्यांच्या निर्मितीचा धोरण बनविण्यात आला आहे.

यावर तात्काळ निर्णय घेण्याची तयारी सरकारने केली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील या नवीन प्रस्तावित 21नवीन जिल्ह्यांची घोषणा ही 26 जानेवारी 2025 रोजी होऊ शकते अशी पुरेपूर शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या नकाशावर लवकरच 21 जिल्ह्यांची वाढ.

महाराष्ट्रातील अनेक भागातील जुन्या जिल्ह्यात असलेल्या तालुक्यामधील जनता आता आपल्या नवीन जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.सरकारने महाराष्ट्रातील विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा, कोकण आणि खानदेश Division In Maharashtra या भागातील जुन्या जिल्ह्यातून नवीन 21 जिल्ह्यांच्या निर्मितीच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे.

त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात असलेल्या तालुके आता नवीन जिल्हे म्हणून घोषित होऊ शकतात.(New Districts In Maharashtra 2025) या सर्व नवीन जिल्ह्यांना आता स्वतःचे मुख्यालय आणि सोबतच नवीन तालुके जुळल्या जाण्याची शक्यता आहे.Proposed List Of New District And Posts In State.

जुन्या जिल्ह्यातून भौगोलिक आधारावर विभाजित होऊन हे अनेक तालुके आता नवीन जिल्हे  होणार आहे.सोबतच या नवीन जिल्ह्यांना लगतचे अनेक तालुकेही त्या जिल्ह्यातून विभाजित करून नवीन जिल्ह्यांमध्ये समाविष्ट केल्या जाईल.

महाराष्ट्रात हे नवीन जिल्हे 26 जानेवारी 2025 पासून अस्तित्वात येवू शकतात?

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून कोणते नवीन तालुके नवे जिल्हे म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे आहे आणि संभावितपणे 26 जानेवारीला महाराष्ट्रात कोणत्या नवीन जिल्ह्यांची घोषणा होऊ शकते आणि हे कोणते नवीन जिल्हे बनणार आहेत New Districts In Maharashtra 2025.

महाराष्ट्रात प्रस्तावित आणि नव्याने बनत असलेल्या या नवीन 21 जिल्ह्यांची नावे काय आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यातून विभाजित होऊन नवा जिल्हा म्हणून अस्तित्वात येत आहेत? हे आपण आता पाहू या

  • महाराष्ट्र सरकारकडे प्रस्तावित जिल्ह्यांच्या यादीत जी नावे आहेत,त्यानुसार, संभावितपणे पश्चिम महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात असलेला भुसावळ हा तालुका आता भुसावळ जिल्हा म्हणून घोषित होणार आहे.
  • मागील काळात खूप चर्चेत असलेले मराठवाडा मधील लातूर,बिड आणि नांदेड या जिल्ह्यांचे विभाजन होत आहे.येथे 3 नवीन जिल्हे अस्तित्वात येनार आहेत.
  • यात सध्या लातूर जिल्ह्यात असलेला उदगीर तालुका आता उदगीर जिल्हा म्हणून अस्तित्वात येत आहे.तर बिड जिल्ह्यातील आंबेजोगाई हा तालुका आता नवीन जिल्हा होणार आहे.मराठवाड्यातीलच जिल्हा नांदेड मध्ये तालुका असलेला किनवट आता किनवट जिल्हा होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हे नवीन जिल्हे लवकरच अस्तित्वात येणार?

  • पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा पुणे आहे.यात महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारा बारामती हा तालुका आहे,मात्र आता बारामती हा नवीन जिल्हा होत आहे.लवकरच बारामतीचे नवीन जिल्हा म्हणून घोषणा होणार आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात दोन तालुके आता नवीन जिल्हे होणार आहेत.नाशिक मधील मालेगाव तालुका आता मालेगाव जिल्हा म्हणून अस्तित्वात येणार आहे. तर नाशिक मधीलच कळवण तालुका आता कळवण जिल्हा होत आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रात असलेले तीन जिल्हे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील काही तालुक्यांना जोडून आता माणदेश नावाने नवीन असा जिल्हा बनणार आहे. माणदेश या नवीन जिल्ह्याला सातारा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना भौगोलिक आधारावर नवीन बनत असलेल्या मानदेश जिल्ह्याला जोडल्या जात आहे. माणदेश हा नवीन जिल्हा आणि याचा मुख्यालय म्हणून राहण्याची शक्यता आहे.

कोकण आणि ठाणे भागात हे बनणार नवीन जिल्हे?

  • कोकण भागात असलेला आणि मुंबई नजीकच्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन या भागात आता 3 नवीन जिल्हे  अस्तित्वात येणार आहे.
  • कोकण किनारपट्टीचा भाग असलेला पालघर जिल्ह्यातून आता जव्हार तालुका हा नवीन जिल्हा म्हणून घोषित होत आहे. पालघर मधून विभाजित जव्हार नवीन जिल्हा बनविण्यात येत आहे.
  • तर कोकण विभागातील रत्नागिरी भागात असलेला मंडणगड हा नवीन जिल्हा होत आहे.
  • रायगड जिल्ह्यातील महाड तालुका आता महाड जिल्हा म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.
  • ठाणे मधील तालुका असलेला मीरा-भाईंदर आता मीरा-भाईंदर जिल्हा होणार आहे.
  • तर ठाणे जिल्ह्यात तालुका असलेला कल्याण हा आता नवीन जिल्हा होत आहे. कल्याण हा नवीन जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येणार आहे.
  • खानदेश मधील बुलढाणा जिल्ह्यात असलेला खामगाव तालुका आता खामगाव जिल्हा म्हणून घोषित होणार आहे.
  • अहमदनगर जिल्ह्याला विभाजित तीन नवीन जिल्हे अस्तित्वात येण्याची शक्यता.यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तालुका शिर्डी जिल्हा होणार आहे.या जिल्ह्यातील  श्रीरामपूर तालुक्याला नवीन जिल्हा म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.तर संगमनेर हा तालुका आता जिल्हा म्हणून घोषित होऊ शकतो.

विदर्भात हे होणार नवीन नवीन जिल्हे?

तर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात असलेला जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका पुसद हा आता नवीन जिल्हा होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून पुसदला यवतमाळ जिल्ह्यातून विभाजित करून पुसद हा नवीन जिल्हा बनविण्याची मागणी होत होती. यवतमाळ आणि वाशिम मधील काही तालुक्यांना जोडून पुसद आता नवीन जिल्हा होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्याला या जिल्ह्यापासून विभाजित करण्यात येणार आहे.नवीन जिल्हा म्हणून अचलपूर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका हा आता साकोली जिल्हा होत आहे.

तर महाराष्ट्रात दुर्गम भाग असलेला गडचिरोली जिल्ह्यातील तालुका असलेला अहेरी ला अहिरे जिला म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे.

नवीन तालुके आणि नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीवर विधिमंडळात रंगली चर्चा.

यापूर्वी नागपूर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विविध भागातील आमदारांमध्ये आपापल्या भागातील नवीन तालुके आणि नवीन जिल्हे तसेच तालुका,जिल्ह्यांचे विभाजन,आणि नवीन जिल्हा ( New Districts In Maharashtra 2025 )निर्मिती संदर्भात चर्चा झाली होती.

या दरम्यान कोकण विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेत सरकारने बनवीलेल्या समितीला राज्यातील विविध जिल्ह्यातून नवीन तालुक्यांचे प्रस्ताव,तालुक्यांचे नवीन जिल्ह्यात समावेश,या संदर्भात आपला अभ्यास आणि याचा अहवाल सरकारला देण्याचे निर्देश देण्यात आले होते.(New Districts In Maharashtra 2025)

दरम्यान हा अहवाल सरकारला सध्या मिळाला किंवा नाही याची अधिकृत माहिती सध्या सरकारने समोर आणलेली नाही. मात्र विधिमंडळ अधिवेशन संपताच, नवीन जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडे जे प्रस्ताव आहे त्यावर सरकारने आता निर्णय घेऊन घोषणा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती,सरकारच्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे.

New Districts In Maharashtra 2025 :

ही आहेत संभाव्य प्रस्तावित आणि नवीन जिल्ह्यांची यादी

  • भुसावळ (जळगाव)
  • उदगीर (लातूर)
  • अंबेजोगाई (बीड)
  • मालेगाव (नाशिक)
  • कळवण (नाशिक)
  • किनवट (नांदेड)
  • मीरा-भाईंदर (ठाणे)
  • कल्याण (ठाणे)
  • माणदेश (सांगली/सातारा/सोलापूर)
  • खामगाव (बुलडाणा)
  • बारामती (पुणे)
  • पुसद (यवतमाळ)
  • जव्हार (पालघर)
  • अचलपूर (अमरावती)
  • साकोली (भंडारा)
  • मंडणगड (रत्नागिरी)
  • महाड (रायगड)
  • शिर्डी (अहमदनगर)
  • संगमनेर (अहमदनगर)
  • श्रीरामपूर (अहमदनगर)
  • अहेरी (गडचिरोली)

महाराष्ट्रातील या सर्व New Districts In Maharashtra 2025 प्रस्ताव सरकारकडे आहे. यावर लवकरच सरकारची मंजुरी मिळून 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील या नवीन जिल्ह्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

5 × 5 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.