New District In Maharashtra : महाराष्ट्रात सध्या खूप जिल्हे आहेत आणि येणाऱ्या नवीन वर्षात जानेवारी महिन्यात एका नव्या जिल्ह्याची भर भर पडून राज्यात आता एकूण 37 जिल्हे होणार आहेत. या जिल्ह्याचे नाव सुद्धा निश्चित झाले असून 26 जानेवारीला महाराष्ट्रातील या नव्या जिल्ह्याची घोषणा होऊ शकते. सध्या या नवीन जिल्ह्याबद्दल सोशल प्लॅटफॉर्मवर चर्चा चांगली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा जिल्हा नेमका कुठे राहणार, आणि या जिल्ह्याचे नाव काय राहणार याबद्दल सध्या उत्सुकता दिसत आहेत.
मागील काही दिवसात महाराष्ट्रात सोशल प्लॅटफॉर्मवर नवीन जिल्ह्यांबद्दल विविध चर्चा होताना दिसत आहे. मागील अनेक वर्षात महाराष्ट्रात विविध ठिकाणी नवीन जिल्हे व्हावे अशी मागणी होत आहे. महाराष्ट्रात आणखी किती जिल्हे व्हावे, नवीन जिल्ह्यांची मागणी कोणत्या भागात होत आहे. त्या ठिकाणी नवीन जिल्ह्याची किती गरज आहे,आणि त्या जिल्ह्यांच्या नकाशा आणि सीमा कशा राहणार कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यामधील एका तालुक्याला जिल्ह्याचे रूप येणार, आणि या नवीन जिल्ह्यांना तेथील एकूण किती तालुके जोडणार?या दरम्यान कोणता जिल्हा तुटून तेथे नवीन जिल्हा अस्तित्वात येईल, या बाबीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारकडेही राज्यात अनेक नवीन जिल्ह्यांचे प्रस्ताव विचाराधीन असल्याने सरकार आता कोणत्या नव्या जिल्ह्याची घोषणा करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उदगीर संदर्भात होत आहेत चर्चा.
पण सध्या लातूर जिल्ह्यातील उदगीर यावर सर्वांचे लक्ष येऊन ठेपले आहे. कारण सोशल मीडियावर उदगीर हा नवीन जिल्हा बनणार असून 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील 37 वा जिल्हा म्हणून उदगीर जिल्हा अस्तित्वात येईल असे मेसेज व्हायरल होत आहेत. प्रसारित होत असलेल्या माहितीनुसार,नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 26 जानेवारी रोजी सध्या लातूर जिल्ह्यात असलेला उदगीर तालुका हा जिल्ह्यात रूपांतरित होणार आहे.
सरकार आता राज्यातील 37 वा जिला म्हणून नव्या नावासह या नवीन जिल्ह्याची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.याबाबत सध्या व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ही अफवा आहे की यांच्यात वास्तविकता आहे हे अद्याप अनेकांना समजलं नाही.दरम्यान उदगीर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार आणि मुखेड हे तालुके आणि यातील अनेक गावांचा समावेश होणार असल्याचेही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले मेसेज खोटे.
लातूर जिल्ह्यात असलेल्या उदगीर तालुक्याला जिल्ह्याचे रूप घेणारा आणि यामध्ये नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा आणि मुखेड या तालुक्यांचा समावेश होणार याबाबत मेसेज व्हायरल होत असताना या तालुक्यामधील जनतेमध्ये संभ्रम असल्याचे दिसत आहे, मात्र या भागाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्हायरल होत असलेल्या नवीन जिल्हा निर्मिती संदर्भात आणि त्यांच्या भागातील तालुक्यांचे नवीन जिल्ह्यात समाविष्ट होणार असल्याचे व्हायरल मेसेज खोटे असल्याचा दावा केला आहे.
उदगीर जिल्हा निर्मित होणार आणि यात नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार आणि मुखेड तालुके समाविष्ट होणार याबाबत चर्चांना उधाण आले असताना आमदार चिखलीकर यांनी या चर्चांना फक्त अफवा करार दिले आहे.
प्रशासकीय स्तरावर कोणत्याही हालचाली नाही.
राज्यात एखादा जिल्हा अस्तित्वात येणार आणि त्यासाठी घोषणा होणार असेल तर प्रशासनिकांनी राजकीय स्तरावर हालचाली मोठ्या प्रमाणात वाढतात, मात्र, यासंदर्भात या भागात कोणत्याही प्रशासकीय हालचाली दिसून येत नाहीत. राज्यात एखादा नवीन जिल्हा निर्मित करावयाचे असेल तर त्यासाठी स्थानिक भागात जनता, प्रशासन आणि जनप्रतिनिधींकडून दावे हरकती सूचना मागविल्या जातात. जर नवीन जिल्हा निर्माण होत असेल तर यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आणि निर्णयही आवश्यक असते. सोबतच नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी भौगोलिक परिस्थिती, त्याची गरज आणि यासाठी सरकारी आणि प्रशासनिक प्रक्रियाही खूप मोठी असते.
मात्र उदगीर जिल्हा निर्माण करण्यासाठी या संदर्भात सध्या प्रशासनिक स्तरावर कोणत्याही हालचाली सुरू नाहीत.सोशल प्लॅटफॉर्मवर वायरल होत असलेल्या माहिती व्यतिरिक्त, प्रशासन आणि सरकारकडून याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसून सार्वजनिकपणे घोषणाही केलेली नाही. त्यामुळे प्राथमिक स्तरावर या संबंधात फक्त अफवा उडत असल्याचे दिसत आहे.