काँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचा भव्य आक्रोश मोर्चा!

काँग्रेस कमिटीचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचा भव्य आक्रोश मोर्चा!

*नेर तालुका प्रतिनिधि : मुदस्सर शेख*

तालुक्यातील हजारो शेतकरी एकवटले तहसीलदारांना दिले निवेदन.

यवतमाळ जिल्ह्यात कापूस मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच हा जिल्हा आत्महत्यासाठीही अग्रेसर म्हणून गणल्या जाते. उत्पादनापेक्षाही बाजारपेठेत कमी भाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले असतांनाही, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्या विषयी विरोधी धोरण राबवीत असल्याने, आज काँग्रेस कमिटीच्या वतीने आजंती रोडवरील देशमुख लाॅन येथून यवतमाळ अमरावती महामार्ग व शहरांतील मुख्य मार्गावरुन नेर तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आक्रोश मोर्चाचे निवेदन नेर तहसीलच्या तहसीलदाराला देण्यात आले. दिलेल्या निवेदनात सोयाबीनला 7000 व कापसाला १०,००० दहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळावा, खरीप पिकांच्या विमाधारकांना सरसकट विमाचा लाभ देण्यात यावा. जुलै ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्यात यावी. सिंचनासाठी शेतकऱ्याला १२ तास दिवसा विज पुरवठा अखंडित देण्यात यावा.

या मागण्यांसह १५ प्रमुख मागण्या मागण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी केले.आक्रोश मोर्चाचे नियोजन काँग्रेसच्या सर्व शाखेचे पदाधिकारी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन एस यु आय शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − seven =