राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तार, प्रसार व पक्ष संघटन मजबूत करून मा.अजितदादा पवार साहेब यांची विकासात्मक विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आज दिनांक-०३ डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील ग्राम माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली व आमदार मा.श्री अमोल मिटकरी साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष कारंजा,श्री जयकीसन राठोड माजी सभापती जिप वाशिम,श्रीमती सोनालीताई ठाकूर पक्ष निरीक्षक अमरावती,श्री अशोक परळीकर पक्ष निरीक्षक यवतमाळ,श्रीमती सीमाताई सुरुशे राकापा महिला जिल्हाध्यक्ष वाशिम,श्री गजाननराव अवताडे जिल्हा उपाध्यक्ष वाशिम,श्री लक्ष्मणराव इंगोले वाशिम,श्री किसन राठोड,श्री प्रशांत गोळे,श्री मोहन भताने,श्री मोहन चौधरी जिप सदस्य,श्री प्रकाश राठोड,श्री सुनील पाटील अखंड तालुकाध्यक्ष वाशिम,श्री अशोक जाधव तालुकाध्यक्ष रिसोड,श्री सुशांत पाटील तालुकाध्यक्ष मालेगाव,श्री राजेश नेमाने तालुकाध्यक्ष मानोरा,श्री संतोष ठाकरे तालुकाध्यक्ष मंगरुळपीर,श्री अरुण श्रीसागर शहराध्यक्ष रिसोड, श्री आकाश पाटील,मो काशीफ, काझी भाई व गजानन बाजड सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.आयोजित कार्यक्रमात वाशिम तालुक्यातील सर्व आठ सर्कल मधील सर्कल प्रमुख यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.